आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच - स्थानिक स्वराज्य संस्थांना जादा अधिकारांची गरज - राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - विधानसभेच्या निवडणूका असलेल्या पाच राज्यांसह आता जम्मू-काश्मीरमध्येही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी युपीए सरकारच्या योजनांचा पाढा वाचला. जम्मू येथे आयोजित पंचायत समिती-ग्रामपंचायत सदस्यांच्या संमेलानाला ते संबोधीत करत होते. राहुल गांधी यांनी माहिती अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा यासारखे अधिकार काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारने सर्वसामान्यांना दिल्याचे सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना अधिकाधिक अधिकारांची गरज असल्याचे सांगत 21 व्या शतकात त्यांना हे अधिकार मिळालेच पाहिजे, असे ते म्हणाले. हे अधिकार तुम्हाला मिळण्यासाठी काँग्रेस तुमच्यासाठी लढेल. मात्र, हे एका दिवसात होणारे काम नाही, असे नमुद करत ही लढाई आपल्याला एकत्र येऊन लढावी लागेल आणि ते अधिकार तुम्हाला मिळवून देणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संमेलनात महिलाची उपस्थिती कमी असल्याकडे लक्ष्य वेधत राहुल गांधी म्हणाले, महिलांचाही सत्तेत वाटा वाढला पाहिजे. त्यांनाही त्यांच्या अधिकारांची माहिती करुन दिली पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये विकास होण्यासाठी दोन-तीन महत्त्वाच्या बाबी आहे. येथील सरपंच आणि स्थानिक स्वराज्य संस्थाना जास्तीत जास्त अधिकार मिळाले पाहिजे. युवकांना रोजगार आणि त्यासाठीचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. महिलांचाही विकासात मोठा वाटा असला पाहिजे.
राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सरपंच परीक्षित सिंह जागेवर उभे राहिल आणि गेल्या तीन वर्षांपासून मी सरपंचांच्या अधिकारांची मागणी करत आहे. मात्र मला तुमच्या पर्यंत पोहचू दिले जात नाही. तेव्हा परत माइकचा ताबा घेत राहुल गांधी म्हणाले, मी येथे तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीच आलो आहे. तुमच्या मागण्या ओमर अब्दुल्ला सरकारकडून लवकरात लवकर पूर्ण करुन घेतल्या जातील. त्यासाठी मी त्यांच्याशी बोलेल, असे आश्वासन त्यांनी दिले.