आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gadhi Want Finally To Become Prime Minister

पंतप्रधानपदासाठी अखेर राहुल गांधी यांची तयारी,खासदारांनी नेतेपदी निवड केल्यास शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये मुलायम सिंह आणि गोरखपूरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान गुरुवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अमेठीमध्ये पाय रोवून होते. त्यांनी येथे सभा घेण्याऐवजी लोकांशी थेट संवाद साधण्याला प्राधान्य दिले. या वेळी त्यांनी पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केले. निवडणुकीनंतर आमचे सरकार स्थापन होणार असेल आणि आमच्या खासदारांनी माझी नेतेपदी निवड केल्यास त्या पदाचा नक्की विचार करेन, असे राहुल म्हणाले.
राहुल दोन दिवसांपासून आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. गुरुवारी दुस-या दिवशी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. मी लोकांची सेवा करत असल्याचा बोभाटा करत नाही. मला स्वत:ची टिमकी वाजवण्याची इच्छा नाही. माझे वडील म्हणाले होते, लोकांची कामे करून त्याचा गाजावाजा करू नये. पंतप्रधानपदाच्या उमेदवार निवडीचे काम पक्षाची घटना करते. पक्षामध्ये या पदासाठी सोनिया गांधी, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह आणि ए. के. अँटनी यांच्यासारखे योग्य उमेदवार आहेत. मात्र, खासदारांना हवा असलेला व्यक्ती या पदावर बसेल, असे त्यांनी सांगितले.
मोदींचे नाव घेताच शंकराचार्यांनी पत्रकाराच्या कानशिलात लगावली;
संतापून म्हणाले, बाजूला हो..फालतू गोष्टी करतो
द्वारकापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वरूपानंद सरस्वती यांनी गुरुवारी पत्रकाराच्या कानशिलात लगावली. मोदींच्या पंतप्रधानपदासंबंधी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर त्यांचा तोल गेला.
स्वरूपानंद गुरुवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांची माहिती मिळताच काही पत्रकार त्यांना भेटण्यासाठी तेथे दाखल झाले. एका टीव्ही वाहिनीच्या पत्रकाराने शंकराचार्यांना प्रश्न विचारला, स्वामीजी, जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर..हा प्रश्न पूर्ण झालाही नाही तोच शंकराचार्य भडकले. चल बाजूला हो. फालतू गोष्टी करू नकोस..मला राजकारणावर बोलायची इच्छा नाही.
मोदींनी सांगावे, काय वाटते
पत्रकारांशी बोलताना नंतर शंकराचार्य म्हणाले, मोदी पंतप्रधान झाले तर माझी काहीच हरकत नाही. मोदी पंतप्रधान व्हावेत, असेच मलाही वाटते. परंतु आपल्याला नेमके काय वाटते, हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे.