आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नावे बदलून काँग्रेसच्याच योजना राबवत आहेत मोदी : राहुल गांधी; अमेठी मतदारसंघात दौरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- काँग्रेस राजवटीत राबवलेल्या योजनांची नावे बदलून त्या नव्याने राबवण्याचा धडाका चालवल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारकडे स्वत:च्या अशा काहीच योजना नाहीत, असे ते म्हणाले. मोदी सरकारला कारभार चालवता येत नसेल तर त्यांनी काँग्रेस पक्षाला तसे सांगावे, आम्ही सरकार चालवू, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

अमेठी विधानसभा मतदारसंघात त्यांचा तीन दिवसांचा दौरा बुधवारपासून सुरू  झाला. पहिल्या दिवशी त्यांनी जगदीशपूरजवळील कठौरा गावात शेतकऱ्यांची बैठक घेतली. जीएसटीचा आराखडा काँग्रेसने तयार केला. जीएसटी १८ टक्क्यांहून अधिक लावला जाऊ नये, असे काँग्रेस पक्षाने अाधीच स्पष्ट केले होते. परंतु भाजपने हा दर २८ टक्के इतका केला. हा लोकांशी विश्वासघात आहे. भाजपला जीएसटी समजलेले नाही आणि त्यांनी अंमलबजावणीही केली,  असे राहुल गांधी म्हणाले.

अमेठी जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांना दौरा स्थगित करण्याची विनंती केली होती. राहुल गांधींचा दौरा रद्द करण्याचा योगी सरकारचा कट असल्याचा आरोप करत काँग्रेसने दौरा रद्द करण्यास नकार दिला.

नोटाबंदीनंतर बेरोजगारी वाढली
राहुल गांधी यांनी म्हटले, नोटाबंदीनंतर लाखो व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले. यामुळे बेरोजगारीत वाढ झाली. देशात दररोज ३० हजारांहून अधिक तरुण रोजगाराच्या शोधार्थ बाहेर पडतात. भाजप सरकार तरुणांना रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, असे अाश्वासन मोदी सरकारने दिले होते. परंतु येथे तर सर्व काही मेड इन चायना आहे. जनतेने मेड इन चायनापासून दूर राहावे, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने
राहुल गांधी  कठौरा येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना, गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयासमोर शेतकऱ्यांची िनदर्शने सुरू होती. १९८४ मध्ये सम्राट बायसिकल्स कंपनीसाठी सरकारने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या ४०० गुंठे जमिनी परत कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. सम्राट कारखाना सुरू झाला, पण तो लगोलग बंदही पडला होता. कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने यापैकी १०० गुंठे जमीन विकतही घेतली. कारखाना बंद झाल्यामुळे आमची जमीनही परत करावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...