आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघटनेच्या बंदीवरून वाद, राहुल गांधी आणि स्मृती इराणीही समोरा-समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे आयआयटी-मद्रासच्या दलित विद्यार्थ्यांच्या आंबेडकर पेरियार संघटनेला महागात पडले. संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. मोदी सरकारवर टीका केल्यामुळे आयआयटी विद्यार्थ्यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. आता पुढे काय ? बोलण्याचे स्वातंत्ऱ्य हा आमचा हक्क आहे. त्यास विरोध झाला किंवा चर्चा दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात लढा देऊ, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्याला इराणी यांनी ट्विट करूनच उत्तर दिले. पुढल्या वेळी आपला लढा स्वत: लढावा. मी लवकरच अमेठीत परतणार आहे. तेथे तुम्हाला (राहुल यांना) पाहून घेईन. मला वेळ आणि ठिकाण सांगा. मी प्रत्येक मुद्द्यावर चर्चेस तयार आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान अमेठीत गुंडागर्दीला मी घाबरले नव्हते, हे तुमच्या लोकांना सांगून ठेवा. आताही घाबरत नाही. गुरुवारी तुम्ही एनएसयूआयला काही सूचना केल्या.

वाक््स्वातंत्र्याचे हनन नाही : आयआयटी
संस्थेने कोणाच्याही बोलण्याच्या स्वातंत्र््याचा हक्काचे हनन केलेले नाही, असे आयआयटी मद्रासच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परंतु कोणतीही विद्यार्थी संघटना संस्थेची परवानगी घेतल्याशिवाय आयआयटी-मद्रास असे नाव वापरू शकत नाही. या नियमांचे विद्यार्थी संघटनेने उल्लंघन केले आहे, असे संचालक प्रो. रामामूर्ती यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...