आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फळ खा.. कामाची चिंता करू नका', अशी आहे मोदींची भूमिका, हिमाचल प्रदेशात राहुल यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - काँग्रेस व्हाइट प्रेसिडेंट राहुल गांधींनी सोमवारी हिमाचल प्रदेशच्या पहिल्या निवडणूक दौऱ्यातील एका सभेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल म्हणाले, गीतेत असे लिहिले आहे की, 'कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका'. पण मोदींनी याचा अर्थ असा काढला की, 'फळ सगळ्यांनी खाऊन टाका, कामाची चिंता करू नका'. राहुल गांधी आज हिमाचल प्रदेशच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राज बब्बर आणि सलमान खुर्शीदही आज हिमाचल प्रदेशात आहेत. कांग्रेसने वीरभद्र सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले आहेत. हिमाचल विधानसभेसाठी 9 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निकाल 18 डिसेंबरला लागणार आहेत. 

शाहांच्या मुलाबाबत का बोलत नाहीत, मोदी?
- राहुल म्हणाले, मोदी भ्रष्टचार संपवण्याच्या गप्पा करतात. पण अमित शाहांच्या मुलाबाबत तोंडातून एकही शब्द काढत नाहीत. 
- त्यांनी विचारले की, शाह यांच्या मुलाची कंपनी 50 हजार कोटींहून 80 हजार कोटींपर्यंत कशी पोहोचली. 
- राहुल गांधी पुढे म्हणाले, मोदी म्हणायचे की, ते जनतेच्या पैशाचे चौकीदार आहेत, कोणाला काही खाऊ देणार नाही. पण तुम्ही चौकीदार नाही तर भागीदार आहात. 

UPA ची सत्ता आल्यास GST मध्ये बदल करणार.. 
- राहुल म्हणाले की, पर्यंटनाला 2000 कोटींचा फटका बसला आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे हिमाचलचीही वाईट अवस्था झाली आहे. जीएसटीने व्यापार बुडवला आहे. ते म्हणाले, की केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत आली की सर्वात आधी जीएसटीमध्ये बदल करू. 
- राहुल म्हणाले, मोदी सरकारने 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे वचन दिले होते. पण रोजगार तर लांबच राहिला उलट नोटाबंदी आणि जीएसटीद्वारे त्यांनी सर्वकाही कठीण करून ठेवले आहे. 
- देशातील सर्वात कमी भ्रष्टाचार हिमाचल प्रदेशमध्ये आहे, हे सरकारच्याच प्लानिंग कमिशनने सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले. एज्युकेशनमध्ये हिमाचल तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छतेत पहिल्या तसेच हागणदारीमुक्त होणारेही पहिलेच राज्य असल्याचेही ते म्हणाले. 
- मोदींनी गुजरातला कंगाल केले आहे. तेथील शेतकऱ्यांची साडे हा एकर जमीन हिसकावून घेतली, असेही राहुल गांधी म्हणाले.  
- राहुल गांधी म्हणाले, हिमाचलमध्ये 4 मेडिकल कॉलेज आहेत, गुजरातमध्ये मात्र एकही नाही. हिमाचलमध्ये 1500 सरकारी शाळा आहेत तर गुजरातमध्ये 150. हिमाचल प्रदेशातील एकही सरकारी शाळा बंद पडलेली नाही, गुजरातच्या मात्र 13 हजार शाळा बंद झाल्या आहेत, असा दावा राहुल यांनी केला. 
 
बातम्या आणखी आहेत...