आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत आकाश निळ्याऐवजी काळे म्हणाले, तरी सर्व हो म्हणतील; राहुल गांधींचा हल्लाबोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरेमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधी. - Divya Marathi
मथुरेमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधी.
मथुरा (उत्तर प्रदेश) - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहे. सोमवारी त्यांनी मथुरेमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राहुलयांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर हल्लाबोल केला. ते म्हणाले हे सर्व (काँग्रेस कार्यकर्ते) आरएसएस नाही. नसता भागवत स्टेजवर आले असते आणि म्हणाले असते आकाश काळे आहे आणि त्यालाही सर्व हो म्हणाले असते. यापूर्वी राहुल गांधींनी वृंदावनमध्ये बांके बिहारीचे दर्शनही घेतले.

'स्टिव्ह जॉब्स' चा आदर्श ठेवा
राहुल गांधींनी चिंतन शिबिरात अॅपलचे को-फाऊंडर स्टिव्ह जॉब्स यांचे उदाहरणही दिले. ते म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना स्टीव्ह जॉब्सप्रमाणे टीम स्पिरीट तयार करावे लागणार आहे. केवळ काही मोजक्या नेत्यांचे ऐकण्याऐवजी, सर्वांची मते सामावून घेणारी संघटना बनावे लागेल अशी गरजही त्यांनी व्यक्त केली. आपण बीजेपी आणि आरएसएसच्या विचारधारेचे विरोधक आहोत. त्यामुळे ते नेहमी आपल्यावर टीका करतात.

मोदींवरही टीका...
सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी टीका केली. शनिवारी बिहार, रविवारी दिल्ली आणि आज उत्तर प्रदेशातही त्यांनी मोदींवर हल्ला चढवला. ते म्हणाले, मोदी काँग्रेसचे विरोधक आहेत. ते केवळ काँग्रेसवरत फोकस करतात. मी जेथेही जातो त्याठिकाणी त्यांच्याबाबत टीका ऐकायला मिळते. मोदी स्वतःचे जेवढे नुकसान करत आहेत, तेवढे आपण सर्वांनी मिळून करायचे ठरवले तरी करू शकणार नाही. मोदी हळू हळू खाली उतरत आहेत. ते खाली जातील आणि त्या जागी आपण असू हे लक्षात ठेवा असे राहुल गांधी म्हणाले.

युपी हे माझे घर...
राहुल गांधींनी यूपी हे आपले घर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले जेव्हा मला कोणी भारतातून कोठून आहात असे विचारते तेव्हा मी अलाहाबाद आणि काश्मीर असे उत्तर देतो. मी जम्मू-काश्मीरला गेलो की ते मला घर असल्यासारखेच वाटते. त्याचप्रमाणे जेव्हा मी यूपीमध्ये असतो तेव्हा मला घरी असल्यासारखेच वाटते असे राहुल गांधी म्हणाले. शिबिरात यूपीचे काँग्रेस नेते राज बब्बर, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह, रीता बहुगणा जोशी, प्रदीप जैन, पीएल पुनिया, निर्मल खत्री, प्रदीप जैन हेही उपस्थित होते.

शिबिर आयोजित करण्याचे कारण
शिबिरात उपस्थित असलेले काँग्रेस नेते मधुसूदन मिस्‍त्री म्हणाले की, हे शिबिर मिशन-2017 (यूपी विधानसभा निवडणूक) ची तयारी आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच राहुल गांधी यूपी कांग्रेसच्या नेत्यांना भेटायला आले आहेत. काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात स्वबळावर उतरण्याचा विचार करत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधींनी केले बांके बिहारीचे दर्शन...