आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांनंतर गांधी कुटुंबातील सदस्य अयोध्येत, वादग्रस्त ढांचापासून 1 KM दूर राहिले राहुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांनी महंत ज्ञानदास यांची भेट घेतली. - Divya Marathi
राहुल गांधी यांनी महंत ज्ञानदास यांची भेट घेतली.
फैजाबाद - किसान यात्रेच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी राहुल गांधी अयोध्येत पोहोचले आहेत. काँग्रेस उपाध्यक्षांनी हनुमान गढी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर महंत ज्ञानदास यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. अयोध्येतील वादग्रस्त ढाचांकडे मात्र राहुल गेले नाही. 1992 मध्ये वादग्रस्त ढांचा पाडल्यानंतर नेहरु-गांधी कुटुबांतून अयोध्येत आलेले राहुल पहिले सदस्य ठरले आहेत. 1990 मध्ये राजीव गांधी सद्भावना यात्रेदरम्यान अयोध्येत आले होते.

- फैजाबाद जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामदास वर्मा यांनी सांगितले, की मंदिर दर्शन आणि महंत ज्ञानदास यांच्या भेटीशिवाय त्यांचा येथे कोणताही कार्यक्रम नव्हता.
- काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की मंदिर दर्शन आणि महंतांची भेट याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हनुमान मंदिरात घेतले दर्शन
बातम्या आणखी आहेत...