आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींनी बोस्टनमध्ये राहुलची केली होती सुटका; डॉ. स्वामी यांचा सनसनाटी दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- काही वर्षांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बोस्टनमध्ये अटक झाली होती. १.६० लाख डॉलरसह त्यांना अटक झाली होती. त्यांच्याजवळून एक पांढऱ्या रंगाची पावडरदेखील जप्त करण्यात आली होती. राहुलला पकडण्यात आल्यानंतर सोनिया गांधी यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ रडून गयावया केली होती, असा सनसनाटी दावा भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला.

सोनिया यांनी गयावया केल्यानंतर वाजपेयी यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कार्यालयात संदेश पाठवून राहुल गांधी यांना सोडवले होते. त्या वेळी तुम्ही पत्रकार आणि इतर कोणाच्याही पोटात का दुखले नव्हते? आसारामबापू यांच्या जामिनावरील सुनावणीसाठी येथे दाखले झालेल्या स्वामी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना हा सवाल केला. ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज तसेच वसुंधरा राजे यांना लक्ष्य केले जात आहे.