आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींनंतर 32 वर्षांनी काँग्रेसमध्ये युवाराज; अध्यक्षपदासाठी उमेदवार फक्त राहुलच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/अहमदाबाद- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला व पक्षाध्यक्षपदी त्यांची निवड निश्चित झाली. यासाठी दुसरा कुणाचाही अर्ज नाही. मात्र, ११ डिसेंबरला ३ वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होईल. राहुल अध्यक्ष झाल्यावर ३२ वर्षांनी पक्षाचे नेतृत्व पुन्हा तरुणाच्या हाती येईल. राहुल ४७ वर्षांचे आहेत. यापूर्वी १९८५ मध्ये राजीव गांधी ४१ वर्षी अध्यक्ष झाले. या कुटुंबात जवाहरलाल नेहरू सर्वात कमी म्हणजे ४० व्या वर्षी, तर मोतीलाल नेहरू सर्वात जास्त म्हणजे ५८ वर्षी अध्यक्ष झाले होते. सोनिया सर्वाधिक १९ वर्षे अध्यक्षपदी राहिल्या.

 

 नेहरू-गांधी कुटुंबातील राहुल १३२ वर्षांतील सहावे पक्षाध्यक्ष

राहुल हे अध्यक्षपद सांभाळणारे नेहरू-गांधी कुटुंबाचे सहावे व काँग्रेसचे ६० वे सदस्य असतील. अाई साेनियांच्या जागी त्यांची नेमणूक हाेईल. १३२ वर्षे जुन्या काँग्रेसमध्ये साेनियांनी सर्वाधिक १९ वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले.  तसेच गांधी कुटुंबात सर्वाधिक काळ खासदार राहिल्यानंतर राहुल यांच्याकडे अाता ही जबाबदारी येईल. यापूर्वी इंदिरा गांधींची १९५९ मध्ये काँग्रेस  अध्यक्षा म्हणून निवड झाली हाेती; परंतु त्या १९६७ मध्ये खासदार प्रथमच बनल्या. याशिवाय राजीव गांधी १९८१ मध्ये खासदार, तर १९८५ मध्ये अध्यक्ष बनले. साेनिया गांधी १९९८ मध्ये अध्यक्ष बनल्या, तर १९९९ मध्ये प्रथम लाेकसभेवर निवडून अाल्या हाेत्या.


राहुल हे २००४ मध्ये पहिल्यांदाच अमेठीतून निवडून अाले. २४ सप्टेंबर २००७ ला त्यांची महासचिव म्हणून निवड झाली. २००९च्या लाेकसभा निवडणुकीत ते स्टार प्रचारक हाेते. त्यांनी साेनियांपेक्षाही जास्त १२५हून अधिक सभा घेऊन काँग्रेस ला २००४च्या निवडणुकीपेक्षा जास्त २०६ जागा मिळवून दिल्या. या विजयाचे श्रेयही पक्षाने राहुल यांनाच दिले. त्यानंतर राहुल यांनी पंतप्रधान व्हावे अशी पक्षनेत्यांची इच्छा हाेती, मात्र त्यांनी ती नम्रपणे नाकारली. जानेवारी २०१३ मध्ये ते पक्षाचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर २९ राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापैकी केवळ मिझाेराम, मेघालय, पुद्दुचेरी, पंजाब व कर्नाटक या पाच राज्यांत काँग्रेसची सत्ता अाली,  तर बिहार व अरुणाचलमध्ये अाघाडी सरकार बनवले. तसेच २२ राज्यांत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

 


मुख्यालयात झाली बैठक 
- रविवारी पक्षाध्यक्ष निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया आणि 47 वर्षीय राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत पक्ष मुख्यालयात बैठक झाली. पार्टीच्या सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीचे चेअरमन मुलापल्ली रामचंद्रन आणि मेंबर मधुसूदन मिस्त्रीही उपस्थित होते. 
- दोन्ही नेत्यांनी राज्यांच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. प्रत्येक राज्याच्या युनिटना उमेदवारी अर्जाचा एक एक सेट पाठवण्यास सांगण्यात आले आहे. त्यात राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव असेल. 
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि इतर मोठ्यांनी काँग्रेसाध्यक्ष पदासाठी राहुल गांधीच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याशिवाय हे नेते राहुल गांधी अर्ज भरतानाही उपस्थित होते. 

 

शहजाद यांचा हल्लाबोल
या निवडणूक प्रक्रियेत सरदार पटेलसारखा माझाही अपमान झाला, असे राज्यातील नेते शहजाद पूनावाला यांनी म्हटले. शहजाद यांनी या निवडणुकीत होत असलेला गैरव्यवहार समोर आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या प्रचारादरम्यान सांगितले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर... या निवडीचे परिणाम...

बातम्या आणखी आहेत...