आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर बालमृत्यू ही सरकारने घडवलेली शोकांतिका- राहुल, प्रकरण दडपण्याएेवजी कारवाई करावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर विमानतळावरुन उतरुन राहुल पीडितांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले. - Divya Marathi
गोरखपूर विमानतळावरुन उतरुन राहुल पीडितांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले.
गोरखपूर - गाेरखपूर बालमृत्यूप्रकरणाचे खापर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याेगी सरकारवर फोडले. शनिवारी त्यांनी पीडितांची भेट घेतली. सरकारने प्रकरण दडपण्याऐवजी दाेषींवर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ही ‘सरकारनिर्मित शोकांतिका’ असा अाराेपदेखील त्यांनी   केला. पंतप्रधान माेदी ‘न्यू इंडिया’च्या गप्पा मारतात; परंतु अाम्हाला असा भारत नकाे, तर जेथे गरीब त्यांच्या मुलांना रुग्णालयात घेऊन जातीले. या वेळी त्यांनी बाघागाढासह काही गावांतील मृत मुलांच्या नातेवाइकांची भेट घेतली.
 
गाेरखपूरला पिकनिक स्पाॅट बनू देणार नाही : याेगी
मुख्यमंत्री अादित्यनाथ याेगी हेदेखील शनिवारी  गाेरखपूरमध्ये हाेते. त्यांनी या बालमृत्यूस मागील सरकारला दाेषी ठरवले. राहुल गांधींचा ‘युवराज’ व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा ‘शहजादा’  उल्लेख केला. या दाेघांच्या गाेरखपूरला पिकनिक स्पाॅट बनवण्याच्या प्रयत्नांमुळे जनतेत नाराजी अाहे. मागील १२-१३  वर्षांपासून असलेल्या सरकारने अापल्या स्वार्थासाठी या राज्यातील सर्व संस्था नष्ट केल्या, असा अाराेपही त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...