आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : मोदी फक्त सुटाबुटातील लोकांना भेटतात, राहुल गांधींनी साधला निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामनगर (बिहार) - पश्चिमी चंपारण मधील रामनगर येथे आज (शनिवार) काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची प्रचारसभा झाली. यावेळी राहुल यांनी सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. केंद्रात सुटाबुटातील सरकार असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत लालू यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव होते.
राहुल गांधी म्हणाले, 'कपड्यांवरुन बरेच काही कळते. गांधीजी पहिले सुट घालत होते. त्यांनी सुट सोडला आणि फक्त पंचा नेसू लागले. आज फक्त त्यांचे विचार दिसतात. त्यांच्या संग्रहालयात गेले तर तिथे त्यांचा पंचा, चष्मा, तुटलेली घड्याळ आणि त्यांचे विचार भेटतात.' मी कपड्यांविषयी का बोलत आहे, तुम्हाला कळले असेलच असे सांगत ते म्हणाले, 'केंद्रात एक वर्षापूर्वी सुटाबुटातील सरकार आली आहे. ते फक्त सुटाबुटातील लोकांना भेटतात. त्यांच्याकडे गरीबांसाठी वेळ नाही.'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही राहुल गांधी यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, 'गांधीजी शेतकऱ्यांची लढाई लढत होते. ते चंपारण येथे आले होते. शेतकऱ्यांना भेटले. त्यांचे दुःख समजून घेतले. आता आरएसएसचे लोक म्हणतात गरीबांना अक्कल नसते. त्यांना भेटण्याची गरज नाही. यांचा सुट खराब होईल या भीतीने हे तुमच्याकडे येत नाही.'

भाजपचे सरकार आले तर जमिनी हातातून जातील
राहुल गांधी म्हणाले, 'येथे भाजपचे सरकार स्थापन झाले तर गुजरात प्रमाणे सुटाबुटातील लोक येथे येतील आणि म्हणतील ही जमिन आम्हाला आवडली, येथील शेतकऱ्यांना हाकलून लावा. तुम्ही काम शोधण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यात जाल तेव्हा तुम्हाला सांगितले जाईल तुम्हाला आमची भाषा येत नाही, तिथे मारझोड होईल आणि तिथूनही हाकलून देण्यात येईल.' राहुल म्हणाले, जर आमचे सरकार राज्यात आले तर युवकांना येथेच रोजगार उपलब्ध करुन दिले जातील. महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या हिताचे निर्णय होतील. शिक्षणासाठी चार लाख रुपये कर्ज दिले जाईल.
मोदीगेट आणि व्यापमंवरुन घेरले
राहुल गांधी यांनी भाजप सरकारला सर्वबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. सुषमा स्वराज यांचा उल्लेख करुन ते म्हणाले, 'स्वराज यांची मुलगी ललित मोदीसाठी काम करते. वसुंधरा राजेंचे मोदीसोबत व्यावसायिक संबंध आहे. असे असतानाही मोदी म्हणतात की ना खाऊंगा ना खाने दुंगा. असे जर असते तर मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्यावर ते शांत राहिले नसते.'