आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

56 इंचाची छाती 5.6 इंचावर आणेल, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर \'हल्लाबोल\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरमधील बिर्ला ऑडिटोरियममध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी - Divya Marathi
जयपूरमधील बिर्ला ऑडिटोरियममध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी
जयपूर- आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यासोबत असलेल्या कथित साटेलोट्यावरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी सरकारला कुठल्याही परिस्थितीत जमीन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही, अशी वल्गनाही राहुल गांधी यांनी केली.

आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा मानस व्यक्त करत पंतप्रधानांची 56 इंचाची छाती पुढील सहा महिन्यांत 5.6 इंचावर आणेल, असा नरेंद्र मोदी यांना टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. त्यामुळे आगामी संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राहुल यांनी यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर घणाघाती टीका केली. '100 वर्षांपूर्वीच्या सरकारचा रिमोट लंडनमध्ये होता आणि आजही तिकडून बटन दाबताच येथील सरकार काम करत आहे. राजस्थानातील सरकार वसुंधरा राजे या नव्हे, तर ललित मोदी सरकार चालवतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
'लगान' सिनेमाचा दिला संदर्भ..
जयपूरमधील बिर्ला ऑडिटोरियममध्ये राहुल गांधी यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी लगान सिनेमा पाहिला होता. हिंदुस्तानात पूर्वी ब्रिटिश शेतकर्‍यांकडून 'लगान' वसूल करत होते. काबाड कष्‍ट करून देखील शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळत नव्हत. पूर्वी शेतकर्‍यांमध्ये एकी नव्हती. त्याचा फायदा ब्रिटिंशांनी घेतला होता. परंतु आता शेतकरी जागृत झाले आहेत. त्यांना त्यांचे हक्क कळाले आहेत.

शेतकर्‍यांची इंचभर जमीनही घेऊ देणार नाही- राहुल गांधी
भूसंपादन विधेयकातील शेतकरी विरोधातील तरतुदी जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न केले तरी शेतकऱ्यांची इंचभरही जमीन घेऊ देणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

श्रीगंगानगर, हनुमानगड भागात नऊ किलोमीटर पायी चालत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी गुरुवारी ही टीका केली. यापुढे काँग्रेसमध्ये साडेतीन वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या नेत्यांनाच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली जाईल, असे राहुल यांनी या वेळी सांगितले. लोकांच्या समस्या जाणून त्या संसदेत मांडण्यासाठी आपण विविध राज्यांचा दौरा करत असल्याचे राहुलयांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संबंधित फोटो...