आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या वेळी तरी एकत्र या; राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - वेगवेगळ्या निवडणुकांनंतर अखेर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाचे आणखी एक कारण सापडले आहे. काँग्रेसला काँग्रेसशिवाय कोणीही पराभूत करू शकत नाही. म्हणूनच पक्षांतर्गत गटबाजी सोडून कमीत कमी निवडणुकीच्या वेळी तरी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बुधवारी केरळच्या इंदिरा भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी उपस्थितांना कानपिचक्या दिल्या. बैठकीत काही नेते म्हणाले, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत माकपशी कोणत्याच प्रकारे तडजोड केली जाऊ नये. कारण केरळमध्ये हाच पक्ष प्रतिस्पर्धी आहे. त्यावर राहुल म्हणाले, केरळमध्ये माकप काँग्रेसला पराभूत करू शकत नाही यावर माझा विश्वास आहे. केरळमध्ये आेमान चंडी यांना हटवण्याची मोहीम सुरू आहे, परंतु हायकमांड त्यांच्या पाठीशी आहे. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात तडजोड केली जाणार नाही. ठोस पुरावे मिळाल्यानंतर पक्षाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केरळमध्ये काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवण्यासाठी माकप आणि एलडीएफने कंबर कसली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन (९२) यांनी सर्वांना एकजुटीचे आवाहन केले आहे.