आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकार फक्त तीन उद्योगपतींसाठी, भूसंपादन कायद्यावरुन राहुल गांधीची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - काँग्रेस उपाध्यक्ष सोमवारी छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी कोरबा जिल्ह्यातील मदनपूर गावातील नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यावर राहुल यांनी तत्काळ कार्यकर्त्यांना सुनावले, 'आम्ही भाजपवाले नाही, आपण मुर्दाबादच्या घोषणा देत नाही आणि तुम्ही देखील देऊ नका.'
भूसंपादन कायद्यावरुन सरकावर टीका
राहुल गांधी सोमवारी सकाळी विशेष विमानाने बिलासपूर येथे पोहोचले. मदनपूर येथे त्यांनी भूसंपादन कायद्यावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले, 'केंद्र सरकार फक्त तीन उद्योगपतींसाठी काम करत आहे. जनतेशी त्यांना घेणे-देणे नाही.' यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. राहुल यांनी त्यांना लगेच थांबवले आणि आपण भाजपवाले नाही. मुर्दाबादच्या घोषणा देणे आपले काम नाही, ते आपण करत नाही आणि तुम्ही देखील करु नका. भूसंपादन कायद्याबाबत राहुल गांधी म्हणाले, 'आमच्या विधेयकात म्हटले होते की आदिवासींची जमीन त्यांना विचारून घेण्यात येईल. बाजारभावाप्रमाणे तिचे मुल्य ठरवले जाईल. जर पाच वर्षांमध्ये तिथे उद्योग किंवा विकासकाम झाले नाही तर शेतकऱ्यांची जमीन त्यांना परत केली जाईल. मात्र, मोदी सरकारने तयार केलेल्या कायद्यातून या गोष्टी वगळण्यात आले आहे.'

राहुल गांधी म्हणाले, विकासाला कोणाचाही विरोध असणार नाही, पण विकास फक्त काही लोकांचा होणार असेल आणि गरीब आदिवासी व शेतकरी त्याच अवस्थेत राहाणार असतील तर तो विकास काय कामाचा. आदिवासींना विचारून त्यांची जमीन घेतली पाहिजे आणि विकासाचा वाटा त्यांनाही मिळाला पाहिजे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राहुल गांधींचा छत्तीसगड दौरा