आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी बंगळुरुमध्ये केले इंदिरा कँटिनचे उद्घाटन; 5 रुपयांत नाष्टा, 10 रुपयात जेवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा कँटिनमधील जेवणाचा राहुल गांधींनी आस्वाद घेतला. - Divya Marathi
इंदिरा कँटिनमधील जेवणाचा राहुल गांधींनी आस्वाद घेतला.
बंगळुरु - बंगळुरुमध्ये बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी इंदिरा कँटिनचे उद्घाटन केले. सर्वांसाठी स्वस्तात जेवण उपलब्ध करणे हा एकमेव उद्देश असल्याचे राहुल गांधी म्हणाले. येथे 5 रुपयांत नाष्टा आणि 10 रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे. स्वस्तात जेवण उपलब्ध करुन देणाऱ्या राज्यातील काँग्रेस सरकारचा अभिमान असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 
 
ट्विट करुन दिली माहिती... 
- बंगळुरुतील इंदिरा कँटिनच्या उद्घाटनाची माहिती राहुल गांधींनी ट्विट करुन दिली. ते म्हणाले, कँटिनचे उद्घाटन करणार आहे आणि सभेलाही संबोधित करेल. 
- बंगळुरु महापालिकेने 197 वॉर्डमध्ये 102 कँटिन सुरु केले आहे. पालिकेचे आयुक्त एन. मंजूनाथ यांनी सांगितले, की कँटिनमध्ये प्रत्येक प्रहरात (ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर) साधारण 500 थाळींचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. लोकांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला तर थाळींची संख्या वाढवली जाणार आहे. 
- कँटिनमध्ये मुख्य 12 किचन असणार आहे. येथे 25-30 प्रकारचे अन्न पदार्थ तयार केले जातील. 
 
कँटिनच्या जागेवरुन झाला होता वाद 
- कँटिनचे डिझाइन आणि जागेवरुन काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. काही कँटिन खेळाच्या मैदानाजवळ असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरमैय्या यांनी मैदानाजवळ कँटिन नसल्याचे स्पष्ट केले होते. 
- तामिळनाडूमध्ये स्वस्त जेवणासाटी अम्मा कँटिन सुरु करण्यात आले होते. दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललितांच्या  काळात सुरु झालेल्या कँटिन लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. त्याच धरतीवर कर्नाटकमध्ये काँग्रेसने इंदिरा कँटिन सुरु केले आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काँग्रेसने लावले इंदिरा - राहुल यांचे होर्डिंग्ज..
बातम्या आणखी आहेत...