आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Invoking To Congres Party\'s Activist

जॉब्जप्रमाणे पक्षाचे भाग्य बदला, राहुल गांधी यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांची गोष्ट सांगून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना एकतेचा मंत्र दिला. ‘कार्यकर्ते, नेत्यांनी स्टीव्हप्रमाणे संघभावनेने काम करावे. तसे झाले तरच पक्षाचे भाग्य बदलू शकते,’ अशी टिप्पणी राहुल यांनी केली.

कार्यकर्त्यांच्या चिंतन शिबिरात राहुल गांधी म्हणाले, ‘स्टीव्ह जॉब्ज यांनी अस्तित्व गमावत असलेल्या अॅपल कंपनीला एकतेचा मंत्र देऊन पुन्हा उभे केले. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या विचारांत एकरूपता आणायला हवी.

राहुल यांनी ही कथा ऐकवली : राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले, तुमच्या कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते. मग तुम्ही ती पुन्हा कशी उभारली? असा प्रश्न कोणीतरी स्टीव्ह जॉब्ज यांना विचारला होता. त्यावर स्टीव्ह उत्तरले-लहान असताना मी एका वयस्कर शेजाऱ्याच्या घरी खेळायला जात होतो. एका ज्येष्ठ व्यक्तीने एक मोटार दाखवली. मोटारीजवळ एक ड्रम होता. तेथे २०-२५ दगड होते. वेगवेगळ्या आकारांचे. त्यांनी ड्रममध्ये हे दगड टाकले, मोटार सुरू केली आणि मला म्हणाले आता घरी जा. उद्या सकाळी ये. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला मोटार बंद करण्यास सांगितले. ड्रममधील सर्व दगड एकाच आकाराचे झाले होते. ते चमकतही होते. त्या वेळी ती व्यक्ती मला म्हणाली, ‘जर तुम्ही सर्वांना एका ड्रममध्ये टाकले, त्यांच्यात योग्य रीतीने चर्चा प्रक्रिया सुरू केली, त्यांना त्यांची योग्य जागा दिली, तर प्रत्येक दगडात असलेली चमक बाहेर येते. ’

चिंतन शिबिरापूर्वी बांके बिहारीचे दर्शन
चिंतन शिबिरात सहभागी होण्यापूर्वी राहुल गांधी बांके बिहारी मंदिरात गेले. प्रदेश काँग्रेस समितीच्या आग्रहावरून अंतिम क्षणी त्यांनी मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात मंदिर दर्शनाचा कार्यक्रम नव्हता.