आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Is Addressing Students At Mount Carmel College, Bengaluru

राहुल-\'स्वच्छ भारत\', मेक इन इंडियाने फायदा होतो? विद्यार्थिनी म्‍हणाल्‍या हो!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - माउंट कार्मेल कॉलेजच्या विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तरांत राहुल गांधी चांगलेच गडबडले. त्यांनी विद्यार्थिनींना विचारले, 'स्वच्छता मोहीम यशस्वी ठरतेय का? मेक इन इंडियाने फायदा झाला का?' मुली म्हणाल्या, हो...! मोदींच्या रोखाने राहुल म्हणाले, "सर्वांना बोलण्याचा हक्क असताना देशात सर्व निर्णय एकच व्यक्ती घेते.' त्यावर मुली म्हणाल्या, "अर्थव्यवस्था ठीक चाललीय ना, मग निर्णय एक जण घेवो की दोघे, काय फरक पडतो.' राहुल विद्यार्थिनींतील प्रश्नोत्तरे...
राहुल : स्वच्छ भारत मोहिमेवर खरंच काम होतंय का ?
विद्यार्थिनी: हो...
राहुल: मला तर कुठंच काम होताना दिसत नाही.
एक शिक्षिका : बहुधा विद्यार्थिनींमध्ये मतभिन्नता दिसते.
राहुल: मेक इन इंडियाने देशाचा फायदा झालायं का? तरुणाईला रोजगार, नोकऱ्या मिळत आहेत का?
विद्यार्थिनी: हो...
राहुल: माझ्या मते भाजप सरकार काम करत नाही.
विद्यार्थिनी : बिहारमध्ये तुम्ही लालूंसोबत आघाडी केली. यामुळे भ्रष्टाचार संपेल असे तुम्हाला वाटते काय?
राहुल: तेथे भाजपला रोखण्यास आमचे प्राधान्य होते. आता तेथे नितीश मुख्यमंत्री आहेत. लालू स्वत: सत्तेत नाहीत. स्वच्छ प्रशासन देण्याचाच आमचा प्रयत्न असेल.
विद्यार्थिनी: इरोम शर्मिलांबाबत तुमचे म्हणणे काय?
त्या मणिपूरमध्ये १० वर्षांपासून उपोषण करत आहेत.
राहुल: सर्वांसोबत चर्चा व्हायला हवी. कुणाचे म्हणणे ऐकून घेतल्याने काहीही बिघडत नाही.
विद्यार्थिनी: मी ईशान्येकडील राज्याची आहे. तेथे १० वर्षांपासून तुमचे सरकार आहे. रस्ते आहेत ना वीज.
राहुल: आमच्या काळात आम्ही बरेच काम केले. ईशान्य भारताला विशेष दर्जा मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे. नागालँडमध्ये अडचणी आहेत. आता नागा करार झाला आहे. आम्ही दोन्ही मुख्यमंत्र्यांना विचारणा केली होती. पण त्यांना याबाबत काहीही माहीत नव्हते.
विद्यार्थिनी: भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय?
राहुल: मुख्य फरक विचारधारेचा आहे. आम्ही सर्वांना स्थान देऊ इच्छितो आणि ते इतरांचे स्थान कमी करत आहेत. बंगळुरूमध्ये मुली पबमध्ये जातात म्हणून त्यांना मारहाण केली जाते, असे चालणार नाही.
विद्यार्थिनी: आजचा तरुण भाजपमध्ये जातोय किंवा "आप'मध्ये. काँग्रेस काय करत आहे?
राहुल: आम्ही १० वर्षे सरकारमध्ये होतो. काही त्रुटी राहिल्या असतील. त्या दूर कराव्या लागतील.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, राहुल यांच्‍या सोबत विद्यार्थिनींचे फोटो..