आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Is Today Addressing Students At Mount Carmel College, Bengaluru

विद्यार्थ्‍यांनी केली राहुल यांची गोची; म्‍हटले- मोदी सरकार चांगले काम करतेय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगलुरू - काँग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) बेंगलुरूच्‍या माउंट कार्मल कॉलेजमध्‍ये भेट देऊन विद्यार्थ्‍यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. मात्र, या चर्चेत राहुलच्‍या प्रश्‍नाला विद्यार्थ्‍यांनी 'मोदी सरकार चांगले काम करत आहे', असे उत्‍तर दिल्‍याने त्‍यांची चांगलीच गोची झाली. त्‍यानंतर राहुल यांची चर्चेचा विषयच बदलवला.

नेमके काय झाले ?
राहुल यांनी विद्यार्थ्‍यांना विचारले, ''स्‍वच्‍छ भारत ही संकल्‍पना खरोखरच साकार होत आहे ? मेक इन इंडियामुळे फायदा होत आहे? तुम्‍हाला रोजगार मिळत आहे ?'' या तीनही प्रश्‍नांवर उपस्‍थ‍ित विद्यार्थ्‍यांनी एक सुरात मोठ्याने 'होय' असे म्‍हटले. त्‍यावर राहुल यांनी प्रतिप्रश्‍न केला की, खरंच तुम्‍हाला असे वाटत आहे. त्‍याला विद्यार्थ्‍यांनी 'यस' असेच उत्‍तर दिले.
बिहार संदर्भात काय म्‍हणाले राहुल?
भाजपला थांबवण्‍यासाठी आम्‍ही तिघांनी बिहारमध्‍ये महायुती केली. आता त्‍या पुन्‍हा नितीशकुमार मुख्‍यमंत्री झाले आहेत. त्‍या ठिकाणी पारदर्शक सरकार देण्‍याचा आमचा पुरेपूर प्रयत्‍न राहील, असे राहुल गांधी म्‍हणाले.
राहुल यांनी अजून काय म्‍हटले ?
> भाजप आणि काँग्रेसमध्‍ये हाच फरक आहे की, ते स्पेसला संपवू पाहात आहेत आणि आम्‍ही सर्वांना स्पेस देण्‍याचा विचार करतो.
> लोकांना काय हवे आहे यावर मी चर्चा करू इच्‍छि‍तो
> FTII विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनाची दखल न घेता त्‍यांना चूप केले गेले. त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेतले गेले नाही.
> बेंगलुरूमध्‍ये मुली पब जातात आणि तिथे त्‍यांना मारहाण होते, हे योग्‍य नाही. भारतात कुणावर बंधन नको.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...