आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये एसपीजी कमांडोंशी भिडले कार्यकर्ते..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशातील किसान यात्रेत व्यग्र आहेत. प्रत्येक शहरात त्यांचा रोड शो सुरू आहे. बुधवारी बरेलीतील त्यांच्या रोड शोमध्ये गोंधळ झाला. काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या दिशेने कूच करू लागताच एसपीजी कमांडोंनी त्यांना अडवले. त्यावरूनच कमांडो आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत झोंबाझोंबी झाली.
यूपीत मंत्र्यांकडूनच गुंडांना आश्रय : राहुल
उत्तरप्रदेश मध्ये गुंडांना मंत्र्यांकडूनच आश्रय मिळत आहे. त्यामुळेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.
राहुल गांधी यांनी किसान यात्रेदरम्यान रोहिलाखंड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राहुल म्हणाले की, सरकारमधील वरिष्ठ पदावरील व्यक्तींकडूनच राजाश्रय मिळत असल्याने गुन्हे वाढले आहेत. त्यामुळेच राज्याची कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडली आहे. राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षावर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की, सायकलचे (सपाचे निवडणूक चिन्ह) चाक थांबले आहे. ते फिरत नाही. त्यामुळे राज्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे.

जंगलराजकडून कशाची अपेक्षा?
विद्यापीठात हुल्लडबाजी वाढली आहे, छेड काढण्याच्या घटनाही वाढत आहेत, अशी तक्रार विद्यापीठातील विद्यार्थिनींनी राहुल गांधींकडे केली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल म्हणाले की, या जंगलराजकडून त्यापेक्षा आणखी काय अपेक्षा करता येईल?
बातम्या आणखी आहेत...