आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधीचा \'किस\' जीवावर बेतला, महिलेला पतीने जिवंत जाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोरहाट/आसाम - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा किस घेणे महिलच्या जिवावर बेतले आहे. त्यांचे चुंबन घेणा-या महिलेला तिच्या पतीने जीवंत जाळले यात तिचा मृत्यू झाला असून पतीनेही स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती आहे. यावर काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
राहुल गांधी बुधवारी आसाम दौ-यावर असताना स्वयंसहाय्यता बचतगटांच्या महिला प्रतिनिधींशी चर्चा करत होते. या चर्चेनंतर काही महिलांनी त्यांच्याशी हात मिळविण्याचा प्रयत्न केल तर, एका महिलेने त्यांच्या गालाचे चुंबन घेतले होते. हे दृष्य देशातील अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखविले होते.
सुत्रांच्या माहितीनुसार, महिला कार्यक्रमावरुन परतल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचे पर्यावसन महिलेला जिवंत जाळण्यात झाले. त्यानंतर त्याने स्वतःलाही पेटवून घेतले. तो 40 टक्के भाजला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
राहुल गांधी यांचे चुंबन घेतल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि महिलेला पेटवून देण्यात आले, या वृत्तास आसाम पोलिसांनी नकार दिला आहे. पती-पत्नी मधील भांडणामुळे घटना घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.