आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल लाइव्ह : पाठलाग करणारे रक्षण कसे करणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्ग/उधारबोंद/सिलचर- लोक मोठमोठय़ा गप्पा करतात. महिला सुरक्षेचा टेंभा मिरवतात. पण ते स्वत:च महिलांची हेरगिरी करतात. पाठलाग करणारे हे लोक देशाचे संरक्षण कसे करणार? येथे छत्तीसगडमध्ये 20 हजार महिला बेपत्ता आहेत. तेथे महिला सुरक्षेबाबत का बोलत नाहीत?

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आसाममध्ये सभा घेतल्या. ते म्हणाले, काँग्रेस फक्त एका व्यक्तीबाबत बोलत नाही. गुजरातच्या हेरगिरी प्रकरणाचा हवाला देताना ते म्हणाले, जे लोक पाठलाग करतात ते नागरिकांना संरक्षण कसे काय देणार? आसाममध्ये राहुल गांधी यांचा हा तिसरा दौरा होता.
जनताच माझी गुरू आहे, मी त्यांचा सन्मान करतो
जनताच माझी गुरू आहे. मी तुमच्याकडूनच सर्वकाही शिकतो. त्यामुळे मी तुमचा सन्मान करतो. तुम्ही देशासाठी मोठे बलिदान दिले आहे. या देशाच्या विकासात येथील जनतेचाच सर्वात मोठा वाटा आहे. सर्व नेत्यांनी गर्व सोडून जनतेमध्ये जायला हवे. कारण सगळ्यांनाच जनतेकडून बरेच काही शिकायला मिळत असते.
आम्ही केवळ एका व्यक्तीबाबत बोलत नाहीत
आम्ही भाजपप्रमाणे सगळ्या समस्या सोडवणार असे दावे करणार्‍या केवळ एका व्यक्तीबाबत बोलत नाहीत. आमच्या मते राजकारण म्हणजे जनतेच्या हाताला शक्ती प्रदान करणे होय. एकच रखवालदार कशासाठी हवा? देशाची किल्ली कोणा एकाच्या हातात नको, तर सगळ्यांच्याच हातात असायला हवी.
गुजरातमध्ये गरिबाला स्वप्ने पाहण्याचा अधिकार नाही
गुजरातमध्ये गरीब व्यक्ती स्वप्ने पाहू शकत नाहीत. फक्त र्शीमंतच तेथे स्वप्ने पाहू शकतात. पण काँग्रेसला असे वाटते की, प्रत्येक व्यक्तीने स्वप्ने पाहावीत. म्हणजे त्याला आपल्या मुलांना चांगले शिक्षण, उज्‍जवल भविष्य प्रदान करता येईल. आम्हाला त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे.
70 कोटी लोकसंख्येचे लक्ष्य
आम्हाला निवृत्तिवेतनाचा अधिकार प्रदान करायचा आहे. त्यामुळे अधिकारांचे क्षेत्र व्यापक होईल. आपला मुलगा-मुलगी मोठेपणे काहीतरी मोठे काम करणार आहे, असा विश्वास प्रत्येकाला वाटायला हवा. 70 कोटी लोक दारिद्रय़रेषेच्या वर आणि मध्यम वर्गाच्या खाली आहेत. हा काम करणारा वर्ग आहे. विमा एजंट, अंगणवाडी कार्यकर्त्या, मजूर हेच लोक देश चालवत आहेत. तेच देशासाठी झगडत आहेत. आम्ही त्यांना शिक्षण देणार. विद्यापीठांची दारे उघडणार. त्यामुळे त्यांची मुलेही स्वप्ने पाहू शकतील.