आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांना आपल्या तरुणांची भीती, मोदींच्या दृष्टीने हेच तरुण बेकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनभद्र / मिर्झापूर - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सोनभद्र आणि मिर्झापूरमध्ये निवडणूक सभा घेतल्या. भाजप नेते नरेंद्र मोदी दुटप्पीपणाने वागतात. यूपी-बिहारमध्ये मोठमोठ्या गोष्टी सांगतात. दुसरीकडे याच राज्यातील लोकांना महाराष्ट्रात ज्यांनी मारहाण केली, त्यांच्या गळ्यात गळे घालतात, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींचे दोन वेगवेगळे चेहरे आहेत. लोकांनी मोदींच्या गुजरात मॉडेलला ओळखले आहे. म्हणूनच आता त्यांनी आपल्या भाषणात या मुद्द्यांचा उल्लेख करणे सोडून दिले आहे. गुजरातच्या महिला फोनवर बोलायलादेखील घाबरतात. मोदी महिलांच्या बळकटीकरणाचा मुद्दा मांडतात. वास्तवात मात्र महिला स्वत: बलवान आहेत. त्यांना केवळ सन्मान देण्याची गरज आहे.
आपल्याला चीनची भीती वाटते, त्यानंतर भारतातील तरुणांची, असे बराक ओबामा यांनी म्हटले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षदेखील आपल्या तरुणांच्या ताकदीला भितात, परंतु गुजरातचे चौकीदार म्हणतात, तरुण बेकार आहेत. त्यांच्याकडे ताकद नाही.
आता अडवाणीजीऐवजी अदानीजी
भाजपमध्ये अगोदर अडवाणीजी होते. आता ते केवळ अडवाणी आहेत. त्यांची जागा अदानी यांनी घेतली. ते अदानीजी झाले आहेत.
मला वाटते की, येथील तरुणांनी पुढे जायला हवे. एक दिवस असा यावा. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपले घड्याळ पाहतील. त्यात ‘मेड इन मिर्झापूर’ लिहिलेले असेल.
बाहेर जाणे हा यूपीतील लोकांचा नाइलाज
यूपीमध्ये गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेसचे सरकार नाही. नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही. म्हणून बाहेर जाणे हा येथील लोकांचा नाइलाज आहे.
मोदी उत्तर प्रदेश व बिहारला ताकद देण्याची भाषा करतात. परंतु याच राज्यातील नागरिकांना मारणार्‍या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत हे लोक आघाडी करतात. त्यांचे तिकडे एक चेहरा आहे, इकडे दुसराच. गुजरात मॉडेलच्या मोठमोठ्या गप्पा मारणार्‍या मोदींनी गुजरातमध्ये शीख शेतकर्‍यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला आहे.