आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी चालवत आहेत गुजरातचे सरकार - राहुल गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोडा.(जम्मू-काश्मीर). काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या डोडा, उत्तर प्रदेशच्या अकबरपूरमध्ये सभा घेतल्या. महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदींच्या लग्नाविषयी टीका केली. पण त्यात अनेक वक्तव्यांची पुनरावृत्तीच होती. लालकृष्ण अडवाणींना दिली जाणारी वागणूक आणि अदानी समूहाशी जवळीक या मुद्द्यांवर त्यांनी पुन्हा पुन्हा टीका केली.

'अडवाणींना पक्षातून हद्दपार केले. जसवंतसिंह यांनाही तशीच वागणूक दिली. अदानी यांना पक्षात आणले. गुजरातमध्येही तेच अदानीच सरकार चालवतात. ते गुजरातचे मोठे उद्योजक आहेत. त्यांना सगळ्या सुविधा कशा मिळतात? त्यांचे (मोदी सरकारचे) कामच असे आहे. ते विकासाच्या मुद्द्यावर बोलतात. गुजरातमध्ये मात्र एका व्यक्तीला हजारो एकर जमीन मोफत दिली. तेथे शेतकरी राहतात.'

गुजरातमध्ये शिखांना नोटीस
काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचा मुद्दा मांडा आहे. तर गुजरातमध्ये शीख शेतकर्‍यांन नोटीसा देऊन हाकलले जात आहे. ते त्याठिकाणी 40 वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांनी स्वत: मला सांगितले.

आता मेड इन कानपूर असायला हवे
घड्याळा, बूट, टी-शर्ट यावर मेड इन चायना असे लिहिलेले असते. पण एक दिवस असा यावा की सगळीकडे मेड इन इंडिया असावे, असे आम्हाला वाटते. एवढेच नव्हे तर मेड इन कानपूर, मेड इन यूपी असे लिहिलेले असावे, असे वाटते.

पुन्हा पुन्हा तेच ते
एनडीएचा फुगा फुटणार

‘धूम’ चित्रपट आला होता. चांगला चालला तर धूम-2, धूम-3 ही तयार झाला. पण त्यांचे इंडिया शायनिंग 2004 मध्ये चालले नाही. 2009 मध्ये पुन्हा फुगा फुगवला. त्यावर कमळ लिहिले अन् उडवले. तेही चालले नाही तर गुजरात मॉडेलचा फुगा फुगवला. जनता पुन्हा हा फुगा फोडेल. एनडीएत प्रत्येक वेळी असे फुगे फुगवले जातात. पण निकालानंतर ते फुटतातच.

आमचा जाहीरनामा चोरला
काँग्रेसने 6 महिन्यांत जाहीरनामा तयार केला. पण भाजपने केवळ हाताची निशाणी काढली आणि कमळ लावले. काँग्रेसने लोकांशी चर्चा करून जाहीरनामा तयार केला. भाजप आणि त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मात्र कधीही जनतेमध्ये गेले नाहीत. जनतेच्या अडचणींबाबतही विचारले नाही. काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत औषधी आणि गरिबांना घराचा अधिकार मिळवून देईल.