आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याच राज्याला नकोय गुजरातचे मॉडेल : राहुल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनितपूर/ विश्वनाथ चरैली/कोहिमा - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी आसामच्या दौर्‍यावर होते. याही वेळी त्यांचे टार्गेट भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे गुजरात मॉडेलच होते. ते म्हणाले, देशातील कोणत्याच राज्याला गुजरातचे मॉडेल नकोय. एकच मॉडेल प्रत्येक राज्यात राबवले जाऊ शकत नाही. या निवडणुकीतसुद्धा भाजपचा फुगा फुटेल, असेही ते या वेळी म्हणाले.

फुग्यात हवा भरली जात आहे
2004 मध्ये इंडिया शायनिंगचा फुगा फुटला. या वेळीसुद्धा फुग्यात हवा भरली जात आहे; पण या वेळी फुगा तीनपट जास्त आवाजासह फुटेल. गरीब भाजपचा फुगा फोडतील, असे राहुल म्हणाले. भाजपचे राजकारण तीन पद्धतींनी चालते. एक म्हणजे हिंदूंना मुुस्लिमांच्या विरोधात उभे करा. दुसरे श्रीमंतांना गरिबांविरोधात करून टाका आणि तिसरे महाराष्ट्रातील लोकांना उत्तर प्रदेशातील लोकांविरोधात भडकवा. ते इंडिया शायनिंगसारख्या घोषणा देतात; पण मी कधीच अशी घोषणा देणार नाही. कारण मी तुम्हा सर्वांना भेटलो आहे आणि मी तुमच्या अडचणी चांगल्या प्रकारे ओळखतो, असे राहुल यांनी सांगितले.

राहुल गांधी केजरीवालांच्या मार्गावर
गुजरात मॉडेलवर संधान : राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार अभियानादरम्यान पहिल्यांदाच गुजरात मॉडेल आणि विकासाचा मुद्दा उचलून धरला. आतापर्यंत फक्त अरविंद केजरीवाल यांनीच या मुद्द्याला हात घातला होता.