आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेता असा निवडा, जो तुमच्यासह तुमच्या मातीशी एकरुप होईल - राहुल गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा / गाझियाबाद / मुरादाबाद - राहुल गांधी शनिवारी वर्धा, मुरादाबाद आणि गाझियाबादमध्ये होते. वर्ध्यातील सभेनंतर त्यांनी मुरादाबादमधील पितळ कारागिरांशी चर्चा केली. नंतर गाझियाबादमध्ये भाषण केले. सहारनपूरला जायचे नसतानाही तेथे गेले. मोदींच्या विरोधात प्रक्षोभक भाषण करणारे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूद यांचा प्रचारही केला.

याला तुम्ही निवडले, ते लखनऊला गेले
ज्यांना तुम्ही निवडले (राजनाथसिंह) ते ज्येष्ठ नेते होते. ते लखनऊला गेले. आता तुम्ही अशा नेत्याची निवड करा, जो मातीशी एकजीव होईल...राज बब्बर (गाझियाबादचे उमेदवार). तुमचा मुद्दा केवळ लोकसभेतच मांडणार नाहीत, तर मला आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींपर्यंत पोहोचवतील.

धूम तर हिट झाली, पण फुगा फुटेल
मुरादाबाद : छोट्या उद्योगांना बळकटी कशी द्यावी, हे कोणीही विचारत नाही. मजुरांना अधिकार कसे द्यावेत, असे कोणी विचारत नाही. मी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी घेतल्या. माझ्याकडे जादूची कांडी नाही. नेत्यांकडे विश्वासार्हतेपलीकडे असते तरी काय ? तुमच्या वेदना आणि शक्तीचा वापर करण्यात येईल.

वर्धा : जेव्हा धूम हिट झाली तेव्हा त्यांनी दुसरा भाग काढला. त्याप्रमाणेच भाजपने 2009मध्ये इंडिया शायनिंगची मोहीम चालवली. परंतु 2009 मध्ये निवडणुकीत त्यांना यश आले नाही. भाजपने यंदा नवीन मॉडेल मांडले आहे- गुजरातचे. 2014 मध्ये मतदार गुजरातच्या विकासाचे मॉडेलचा फुगा फोडून टाकतील.

यूपीए सरकारने 15 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणले. आमचा पक्ष गरिबांच्या हितासाठी लढतो. केंद्र व राज्य सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या योजना गरिबांविषयी असलेली कटिबद्धता दर्शवणार्‍या आहेत. जंगलातील उत्पादनासाठी आदिवासींना त्यांचा हक्क मिळावा, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे.

लोकांना आरोग्य आणि घराचा हक्क मिळावा, असा निर्धार आम्ही केला आहे. दारिद्र्यरेषेवर असलेल्या 70 कोटी लोकांसाठीदेखील काम करावे लागेल. ते अद्याप मध्यमवर्गात पोहोचलेले नाहीत. महिलांचा लोकसभा आणि विधानसभेतील टक्का वाढवला पाहिजे. महिला विधेयक उत्तीर्ण करायला हवे.