आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझुंझुनू - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी राजस्थानात होते. झुंझुनू आणि उदयपूर येथे त्यांच्या सभा झाल्या. अडवाणींसारख्या महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात दिल्या जाणार्या वागणुकीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपमध्ये अडवाणी आऊट आणि अदानी इन झाल्याचे ते म्हणाले.
'भाजप सध्या भ्रष्टाचारावर बोलत आहे, पण ते स्वत:च भ्रष्ट आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा भ्रष्टाचारात बुडाले आहेत. आज ते भाजपत सर्वात समोरच्या रांगेत असतात. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानची परिस्थितीही सर्वांसमोर आहे. एक व्यक्ती (मोदी)भ्रष्टाचाराबाबत वोलते. मात्र, स्वत: न्यायालयाच्या आदेशानंतर लोकपाल लागू करते.'
झुंझुनूच्या सभेत ‘मुर्दाबाद’च्या घोषणा
झुंझुनूमध्ये राहुल गांधी जेव्हा मार्गदर्शन करत होते त्या वेळी एक व्यक्ती मध्येच उभी राहिली. ‘राहुल मुर्दाबाद’च्या घोषणा तिने दिल्या. पण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिला बाहेर काढले. तिची ओळख आणि घोषणाबाजीचे कारण समजू शकलेले नाही.
जाहीरनाम्याचीही चोरी
भाजपने आमचा जाहीरनामा चोरून आपला म्हणून छापला आहे. केवळ आमच्या जाहीरनाम्यावरून हाताची निशाणी काढून कमळ टाकले. स्वत:ची एकही योजना नाही. काँग्रेस गरीब आणि दुर्बलांचा पक्ष आहे. आम्ही लोकांना एकत्र बांधून ठेवतो. ते केवळ गुजरात मॉडेलवर बोलतात. आम्ही गरिबांच्या भल्याचा विचार करतो. त्यांना मात्र उद्योजकांची काळजी आहे.
चोरी करू देणार नाही
काँग्रेस आणि भाजपमध्ये खूप मोठा फरक आहे. भाजप म्हणतो देशाची किल्ली आमच्या हाती द्या, एका व्यक्तीला (मोदी) रखवालदार बनवा म्हणजे सर्व काही ठीक होईल. पण अनेकदा रखवालदारच चोर्या करतात. जर कोट्यवधी रखवालदार असतील तर ते चोरी होऊ देणार नाहीत.
त्यांनी महिला सुरक्षेच्या गप्पा करू नयेत
मी भाजपचे एक पोस्टर पाहिले. त्यावर लिहिले होते, महिलांना शक्ती प्रदान करणार. पण गुजरातमध्ये
पोलिस महिलांची हेरगिरी करतात. महिलांचे फोन टॅप करतात. त्यांचे कार्यकर्ते कर्नाटकमध्ये महिलांना मारहण करतात. विधानसभेत बसून आमदार अश्लील चित्रफिती पाहतात. ते महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा कशा मारू शकतात ?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.