आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Uttarakhand, Congress

महिला सबलीकरणाशिवाय देश महासत्ता होणार नाही, राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहरादून (उत्तराखंड)- महिलांचे सबलीकरण झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही, असे मत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. महिलांनी आम्हाला सांगितले 9 सिलिंडरमध्ये घर चालविता येत नाही. आम्ही लगेच महिलांची मागणी पूर्ण केली. आता प्रत्येक कुटुंबाला 12 सिलिंडर मिळणार आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांची देहरादून येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ते म्हणाले, की उत्तराखंडवर नैसर्गिक संकट कोसळले तेव्हा अवघा देश या राज्याच्या मदतीसाठी पुढे आला. तुम्हाला जेथे कुठे वेदना दिसून येतील तेथे जा, तेथील लोकांना मदत करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. राजकारणात गर्वाचे घर खाली असते. इतरांना मदत केल्याचा कुणाला गर्व नसावा. त्याशिवाय इतरांचे दुःख समजणार नाही.
राहुल गांधी म्हणाले, की मी आज उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पूर्ननिर्माण कार्यावर चर्चा झाली. पर्यटनाचा मोसम सुरू होण्यापूर्वी पूर्ननिर्माण कार्य पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. जेव्हा नैसर्गिक संकट कोसळले तेव्हा लष्कराच्या जवानांनी उत्तरखंडमध्ये मोठे कार्य केले. यावेळी वायुदलाचे एक हेलिकॉफ्टर कोसळले. काही जवानांचा मृत्यू झाला. परंतु, तरीही मदत कार्यात कोणताही अडथळा आला नाही.