बारगड/ओडिशा - ओडिशा दौ-यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अच्छे दिन कुठे आहेत ? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपा सरकार शेतकरीविरोधी असल्याचे म्हटले. बारगडमध्ये त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबांकडेही केंद्र शासनाने दुर्लक्ष केले आहे, असेही ते म्हणाले.
भुसंपादन कायद्याचा संदर्भ देत ते म्हणाले, हा कायदा कॉंग्रेसने मंजूर होऊ दिला नाही, केंद्र सरकारचा हा कायदा शेतकरी विरोधी होता. भाजपाच्या मंत्र्याचे घोटाळे आम्ही उघड केले, पण पंतप्रधान काहीच बोलले नाही असेही ते म्हणाले.