आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi On Strike At The Time Of Rohit\'s Birth Day

रोहितच्या जन्मदिनीच राहुल यांचे उपोषण, संवेदनशील प्रकरणाचे राजकारण-BJP

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील दलित संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी निषेध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. भाजपने त्यांच्या या कृतीचा निषेध करत संवेदनशील प्रकरणाचे काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, तेलंगण सरकारने या प्रकरणाच्या सीबीअाय- सीआयडी चौकशीचे आदेश शनिवारी जारी केले.

रोहित वेमुलाच्या जन्मदिनी राहुल गांधींनी शुक्रवारी रात्री आंदोलक विद्यार्थ्यांसोबत दोन तास घालवले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या कँडल मार्चमध्येही ते सहभागी झाले. त्यानंतर राहुल शनिवारी आंदोलनस्थळी पोहोचले. विद्यार्थ्यांना एकसंघतेचा विश्वास देत त्यांच्यासोबत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले. रोहित जिवंत असता तर शनिवारी तो २७ वर्षांचा झाला असता.
गेल्या काही आठवड्यांतील राहुल यांचा हा हैदराबाद विद्यापीठातील दुसरा दौरा आहे. ‘रोहितचे मित्र आणि कुटुंबीयांच्या विनंतीवरून न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्यात त्यांच्यासोबत उभा राहण्यासाठी मी येथे आलो आहे,’ असे ट्विट त्यांनी केले. विद्यापीठाने वसतिगृहातून काढून टाकल्यामुळे १७ जानेवारी रोजी रोहितने आत्महत्या केली होती. या आत्महत्येला जबाबदार धरून कुलगुरू अप्पा राव, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बंडारु दत्तात्रय यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेत्यांच्या प्रतिक्रिया...