आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Program Omar Abdulla Issue Congress

ओमर सरकारकडून मदत नाही; राहुलच्या सभेत काँग्रेस सरपंचांचे गार्‍हाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जम्मू-काश्मिरातील पंचायत परिषद ओमर सरकारविरोधातील तक्रारींनी गाजली. ओमार सरकार सरपंच व ग्रामपंचायतीना मदत करीत नाही अशी गार्‍हाणी उपस्थित सरपंचांनी मांडल्यामुळे सभेत गोंधळ झाला. पंचायती राज संस्था बळकट करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी राहुल यांनी दिले.

पंचायत परिषदेत राहुल यांच्या भाषणाचा समारोप होत असतानाच उधमपूर जिल्ह्यातील सरपंच परीक्षित सिंग अचानक उठून उभे राहिले आणि त्यांनी गेल्या तीन वर्षात ओमर सरकारकडून कवडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप केला. त्याला उपस्थित इतर सरंपचांनीही पाठिंबा दिला. गेल्या तीन वर्षांपासून केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळत असताना राज्य सरकार मात्र हात आखडता घेत आहे, असा आरोप सरपंचांनी केला. या वेळी सरपंचांना त्यांचा हक्क दिला जाईल, आपण स्वत: यात लक्ष घालू, अशी ग्वाही राहुल यांनी दिली. जम्मू-काश्मीरचे वारंवार दौरे करून सरकारवर दबाव कायम ठेवण्यात येईल. काँग्रेस सरपंचांच्या पाठीशी आहे असा विश्वास राहुल यांनी दिला.