आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक मुलगाच करणार उत्तर प्रदेशचा विकास, कृष्णाप्रमाणेच माझी अवस्था: नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदोई - येथील जाहीर प्रचारसभेत मोदींनी स्वत:ची तुलना कृष्णाशी करत गुजरात आणि यूपीशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, श्रीकृष्णांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला आणि त्यांनी गुजरातला कर्मभूमी मानले. माझा जन्म गुजरातचा पण यूपीने मला दत्तक घेतले. आई-वडिलांचा त्याग करणार नाही. उत्तर प्रदेश हे माझे मायबाप आहेत. हा दत्तक घेतलेला मुलगाच या राज्याचा विकास करून दाखवेल. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात भाजपला भरपूर पाठिंबा मिळाला आहे.  देश पुढे जाईल आणि यूपी मागे राहिले, हे याेग्य ठरेल काय? असा प्रश्न मोदींनी विचारला.  

ते म्हणाले, जो तो आपली मतपेढी सांभाळतो आहे. यूपीला सपा, काँग्रेस, बसपाच्या तावडीतून मुक्त केल्याशिवाय, या राज्याचे नशीब बदलणार नाही. या उत्तर प्रदेशातून मला मिळालेल्या पाठबळामुळेच देशात स्थैर्य असलेले एका पक्षाचे सरकार स्थापन झाले. तुमच्या आशीर्वादामुळे एका गरिबांचा मुलगा या देशाचा पंतप्रधान बनू शकला. सरकार स्थापनेनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल. शांतता हवी असेल तर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे आवश्यक आहे. यात राजकारण नसावे. अापला -परका असा भेद नसावा. राजकीय हत्यांचे प्रमाण यूपीमध्ये सर्वात जास्त आहे. 
 
मित्रो...! कुंडली ते समजदारीवर... 
असे बाेलले मोदी  

{ १० फेब्रु. (बिजनोरमध्ये राहुल टार्गेट) : जर तुम्ही सर्च कराल तर या काँग्रेस नेत्यांवर इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा जास्त चुटकुले आढळतील.  
{ १० फेब्रु. (हरिद्वारमध्ये काँग्रेसला सुनावले): तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा ठेवा, अन्यथा तुमची सर्व कुंडली माझ्याकडे तयार आहे.  
{ ८ फेब्रु. (गाझियाबादेत अखिलेशच्या टोमण्यावर):  ना यांचा समाजवाद समजत नाही की, यांना समजदारी नाही?  
{ ४ फेब्रु (मेरठमध्ये विरोधकांवर) : माझी लढाई स्कॅमशी (समाजवादी, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती) आहे.  
{ ७ फेब्रु. (संसदेत राहुलवर ): शेवटी भूकंप झालाच.  भूकंप आला कसा? याचाच मी विचार करत होतो.  

खुर्ची राखण्याचा मला मोह नाही : अखिलेश
खुर्ची राखण्याचा मला मोह नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदींना दिले. खुर्चीसाठी काँग्रेससोबत अखिलेश यांनी आघाडी केल्याचा आरोप मोदींनी केला होता.
 
मैनपुरीजवळील करहल येथे जाहीर सभेत बोलताना अखिलेश यादव यांनी मोदींच्या आरोपांचा समाचार घेतला. प्रत्युत्तरात ते  म्हणाले, काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून घेण्यात आला अाहे. ही दोन तरुण नेतृत्वाची आघाडी आहे. त्यांच्या डोळ्यासमोर आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने ते असे बेताल बडबड करत आहेत, असा पलटवार अखिलेश यांनी केला. हा पक्ष अजूनही मुलायमसिंग यांचाच असून आमचा करिश्मा १९ फेब्रुवारीला पाहा, असे आव्हान अखिलेश यांनी दिले.

कर्जमाफीसाठी सत्ता कशाला हवी? -राहुल 
राहुल गांधी सीतापूर येथील जाहीर सभेत बोलताना म्हणाले,  मोबाइल चीनकडून येतो आहे. येथील चलन परदेशात जाते आहे. आम्हाला वाटते येथील उत्पादने चीनमध्ये विकली जावीत. त्यामुळे तेथील चलन भारतात येईल. नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’ बंद करावे आणि जनतेकडे जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे माझे मोदींना आवाहन आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ करायची असतील तर सत्ता कशाला हवी? पंतप्रधान या नात्याने असा निर्णय ते घेऊ शकतात. आम्ही उत्तर प्रदेशचे भविष्य बदलू इच्छितो.  भाजप खोटी आश्वासने देतो. नरेंद्र मोदी यांनी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी संपूर्ण देशाच्या हातात झाडू दिला आणि स्वत: परदेशात निघून गेले, असा टोमणा  त्यांनी मारला.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सीतापूरमधील सभेत काय म्हणाले राहुल गांधी... 
बातम्या आणखी आहेत...