आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी नाकारल्यानंतरही सहारनपूरला पोहचले राहुल गांधी, पीडित कुटुंबियांशी संवाद साधला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारनपूर (उत्तर प्रदेश) - राहुल गांधी उत्तर प्रदेशातील सहारनपुरमधील शब्बीरपूर गावात पोहचले. सहारनपूरचे पोलिस अधीक्षक बबलू कुमार यांनी प्रशासनाने त्यांना दौऱ्याची परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. मागील 20 दिवसांपासून सहारनपूरमध्ये हिंसाचार भडकलेला आहे. 5 मे रोजी शब्बीरपूर गावात दलित आणि ठाकूरांमध्ये दंगल उसळली होती. त्यात 60 हून अधिक दलितांची घरे जाळण्यात आली असून ठाकूर समाजाच्या एकाची हत्या झाली होती. आतापर्यंतच्या हिंसाचारात 2 जण मृत्यूमुखी पडले आहेत. 
 
कसा भडकला हिंसाचार... 
- सहारनपूरमधील शब्बीरपूर गावात 5 मे रोजी महाराणा प्रताप शोभायात्रा निघाली होती. यावेळी डीजे वाजवण्यावरुन ठाकूर आणि दलित समुदायामध्ये बाचाबाची झाली होती. यात ठाकूर समाजाच्या एका युवकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. 
- या घटनेनंतर ठाकूरांनी दलितांची 60 पेक्षा जास्त घरे आगीच्या भक्ष्यस्थानी दिली होती. अनेक गाड्यांची जाळपोळ केली. या हिंसाचाराचा दलितांच्या भीम आर्मी या संघटनेने विरोध केला होता. 
- 9 मे रोजी सहारनपूर येथे सर्व दलित समाज एकत्र आला होता. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही हिंसाचार भडकला. जिल्ह्यातील 9 ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. 
- सहारनपूर घटनेच्या विरोधात 21 मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे विरोध प्रदर्शन करण्यात आले. भीम आर्मीने या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. 
 
मायावतींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट 
- 5 मे रोजीच्या हिंसाचारातील पीडित कुटुंबाची बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी 23 मे रोजी शब्बीरपूर येथे जाऊन भेट घेतली. त्यांनी पीडित दलित कुटुंबांना पक्षाच्या निधीतून 25 ते 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. त्यासोबतच एका सभेला संबोधित केले होते. 
- या सभेवरुन घरी परतणाऱ्या दलितांवर रस्त्यात हल्ला करण्यात आला. त्यात एकाची हत्या करण्यात आली. अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर दलितांनी केलेल्या हल्ल्यात दोन घरे जळाली. 
 
मुख्यमंत्री योगींची काय राहिली भूमिका 
- सहारनपूरमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 23 मेच्या रात्री 4 अधिकाऱ्यांना तातडीने लखनऊ येथून सहारनपूरला पाठवले. 
- गाजियाबाद, मेरठ, अलीगड आणि आग्रा येथून 5 पीएसीचे कमांडो रवाना करण्यात आले.
- बुधवारी (24 मे) सायंकाळी सहारनपुरचे जिल्हाधिकारी एन.पी.सिंह आणि पोलिस अधीक्षक सुभाषचंद्र दुबे यांना निलंबीत करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त एम.पी. अग्रवाल आणि डीआयजी जे.के. शाही यांची बदली करण्यात आली आहे. नवे जिल्हाधिकारी म्हणून प्रमोद कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून पोलिस अधीक्षक पदी बबलू कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
पोलिसांनी काय केले 
- या प्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली आहे. भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...