आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Secuarity In Hazaribagh Ranchi Rally

काळे कपडे, काळा गॉगल आणि तीक्ष्ण नजर असणारी राहूल गांधींची सिक्युरिटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी सकाळी विशेष विमानातून रांची मधील बिरसा मुंडा विमानतळावर सुरक्षेच्या घे-यात राहूल गांधी पोहोचले. ठरलेलल्या वेळेनंतर 15 मिनिटांनी राहूल रांचीमध्ये पोहोचले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते विमानस्थळावर उपस्थित होते.

सकाळपासूनच या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. एसपीजी, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अधिक-यांसोबतच सीआयएसएफ आणि जॅप आधिका-यांनी पूर्ण विमानतळच सुरक्षेसाठी ताब्यात घेतले होते. सशस्त्र जवानांसोबतच बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वार्ड विमानतळच्या आत आणि बाहेर चेकिंग करण्यात व्यस्त होते.

सफारी आणि एस्कॉर्ट गाडीला आत पाठवले-
विमानाच्या आगमनापूर्वीच एसपीजी अधीका-याने एक सफारी आणि एक एस्कॉर्ट गाडी विमानतळाच्या आत पाठवली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वार्डला आत पाठवण्यात आले. त्यांनी आत जाऊन सगळे व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. या पथकांनी सगळे काही आलबेल असल्याचा इशारा दिल्यानंतर राहूल गांधी विमानतळाच्या बाहेर आले.

काळा कोट घातलेले एसपीजी आधिकारी
विमानतळाच्या कानाकोप-यात टाय, बेल्ट, काळा कोट आणि काळा चष्मा घातलेले एसपाजी अधिकारी तैनात होते. हे अत्याधुनिक शस्त्रे हातात असणारे जवान येणा-या प्रत्येक गाडीला बारीक बघत होते.
ताफ्यातही होत्या 12 गाड्या
राहूल गांधींच्या ताफ्यात 12 गाड्यांचा समावेश होता. एसपीजीच्या कारकेडमध्ये राहूल यांची सफारी होती. पायलट गाडीनंतर जॅमर आणि त्यानंतर झारखंड पोलिसांच्या गाड्या होत्या.

200 मिटर लांब पाठवले
राहूल यांचे आगमन होण्यापूर्वीच सीआयएसएफ अधिका-याने विमानतळावरील विशेष गेटमधून सशस्त्र जवानांना 200 मिटर आंतरावर पाठवले आणि केवळ काठी असणा-या जवानाना तेथे ठेवले.