आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल मंदिरात दर्शन घेताहेत, मग सिब्बल यांना अयोध्या खटल्यात उशीर का हवा? शहांचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी आतापर्यंत गुजरातमध्ये 21 मंदिरांमध्ये दर्शन घेतले. सोमनाथच्या प्रवेशाबाबत वाद झाला होता. (फाइल) - Divya Marathi
राहुल गांधींनी आतापर्यंत गुजरातमध्ये 21 मंदिरांमध्ये दर्शन घेतले. सोमनाथच्या प्रवेशाबाबत वाद झाला होता. (फाइल)

नवी दिल्ली - कपिल सिब्बल यांनी वक्फ बोर्डाचे वकील म्हणून सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती की, अयोध्या वादाची सुनावणी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर करावी. त्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. एकिकडे राहुल गांधी गुजरातमधील मंदिरांमध्ये दर्शन घेत फिरत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते सिब्बल राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी उशीरा व्हावी असे म्हणत आहेत. राहुल गांधींनी याबाबत आपले मत मांडावे. गुजरातमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी सुमारे 22 वेळा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेले आहेत. 


सुप्रीम कोर्टात काय म्हणाले सिब्बल.. 
सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील असलेले कपिल सिब्बल म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी जेव्हा केव्हा होईल, तेव्हा याचे तीव्र पडसाद कोर्टाबाहेर उमटतील. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी माझी कोर्टाला विनंती आहे की, या प्रकरणावर जुलै 2019 (सार्वत्रिक निवडणुका) नंतर सुनावणी व्हावी. या खटल्यावर अलहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर 7 वर्षांनी सुनावणी होत आहे. 


द्वारकामधून राहुल गांधींनी सुरू केली होती नवसर्जन यात्रा 
गुजरात निवडणूक प्रचारात राहुल गांधींनी आतापर्यंत 22 मंदिरांमध्ये डोके टेकवले आहे. गेल्यावेळी राहुल गांधी सोमनाथ मंदिरात गेले होते. यापूर्वी गुजरातच्या सर्व प्रसिद्ध मंदिरात जाऊन त्यांनी पुजा केली आहे. नरेंद्र मोदींनी भुजमध्ये आशापुरा मातेचे दर्शन घेतले. त्याच ठिकाणाहून त्यांनी नवसर्जन यात्रा सुरू केली होती. 


या मंदिरांमध्ये गेले होते राहुल गांधी 
द्वारकाधीश, कागवडमधील खोडलधाम, नाडियाडमधील संतराम मंदिर, पावागज महाकाली, नवसारीमधील ऊनाई माता मंदिर, अक्षरधाम मंदिर, बहुचराजी मंदिर, कबीर मंदिर, चोटिला देवी मंदिर, दासी जीवन मंदिर, राजकोटचे जलाराम मंदिर, वलसाडमधील कृष्ण मंदिर याशिवाय त्यांनी काँग्रेसच्या नवसर्जन यात्रेत इतरही लहान मोठ्या मंदिरांत दर्शन घेतले. 

 

बातम्या आणखी आहेत...