आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: राहुल गांधींच्या ‘खाट पे चर्चे’त खाटांची लुटालूट; गावकऱ्यांनी पळवल्या खाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुद्रापूर- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी 25000 किलोमीटरच्या ‘किसान महायात्रे’ने उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानिमित्त येथील दुधनाथ बाबा मंदिराच्या मैदानावर ‘खाट पे चर्चा’ ठेवली होती. खाटेवर बसून राहुल यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. राहुल जाताच गावकऱ्यांनी खाटांची लुटालूट केली. त्यामुळे त्यांच्यात झोंबाझोेंबीही झाली.
असा होता नजारा
- राहुल गांधी तीन दिवसांमध्ये देवरिया येथून 2500 किलोमीटर प्रवास करुन दिल्लीला जाणार आहेत. त्यासाठी 250 मिनी रथ आहेत. या प्रवासात राहुल गांधी ठिकठिकाणी शेतकऱ्यांसोबत 'खाट पे चर्चा' करणार आहेत.
- राहुल यांची पहिली 'खाट पे चर्चा' रुद्रपूर येथे होती. येथील सभा संपल्यानंतर लोकांमध्ये खाटा पळवण्याची स्पर्धाच सुरु झाली.
- ज्या खाटेवर बसून लोकांनी राहुल गांधींचे भाषण ऐकले, भाषण संपताच त्याच खाटा घेऊन त्यांनी पळ काढला. त्यासाठी झटापट केली. काही वृद्ध खाटा घेऊन निघाले तर तरुणांनी त्यांच्यासोबत झटापट करुन खाटा पळवल्या.
- झटापटीदरम्यान लोक जीवापेक्षा खाटेला जपत पळत सुटले होते.
- काही वृद्ध आणि महिलांना खाटेचे ओझे उचलता येत नव्हते तेव्हा, त्यानी खाटेचे पाय आणि वासे वेगळे केले. दोरी गुंडाळून घेत खाटेचा सांगाडा नेला.
लाडू आणि पाण्याच्या बॉटलचीही पळवापळवी
- राहुल गांधी यांच्या सभेत लुटालुटीचे सत्र पाहाण्यासारखे होते. सभा स्थानी ठेवलेले 50 किलो लाडूंवरही लोक तुटून पडले होते.
- माध्यमकर्मी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीच्या शेकडो पाण्याच्या बॉटलवरही लोक तुटून पडले होते. ज्याला जेवढे लाडू आणि बॉटल नेता येतील तो तेवढे घेऊन जात होता.
समाजवादी नेत्यांनी साधला निशाणा
- समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी म्हणाले, 'राहुल गांधी स्वतः कधी खाटेवर बसले आहेत ना त्यांना गरीबांची चिंता आहे. त्यांना कळाले पाहिजे की राजकारण हा काही पिकनिकचा खेळ नाही.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील लाइव्ह फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...