आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : काशी विश्वनाथ मंदिरात राहुल गांधींच्या अनुष्ठानाला प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'मिशन पुर्वांचल'ला सुरवात झाली आहे. आज (शनिवार) सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ते वाराणसी विमानतळावर पोहोचले. तेथून कँटकडे रवाना झाले. तिथे रिक्शा चालकांसोबत ते चर्चा करणार आहेत. राहुल गांधी यांचे प्रचार अभियान मिर्झापूर येथून सुरू होणार होते, मात्र पावसाने त्यांचे नियोजन धुवून काढले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अनिल श्रीवास्तव यांनी राहुल गांधी यांचा मिर्झापूरचा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितले आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली होती, मात्र, पावसामुळे सभेच्या ठिकाणी तळे साचले आहे. त्यामुळे येथील कार्यकक्रम रद्द करण्यात आला आहे.
राहुल गांधी LIVE
- रिक्शा चालकांसोबतचा संवाद कार्यक्रम संपला.
- संवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराकडे प्रयाण.
- दुपारी 2.30 नंतर राहुल गांधी काशी विश्वनाथ मंदिरात दाखल झाले.
- राहुल गांधी म्हणाले, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरल आणि तामिळनाडू येथे केंद्र सरकारच्या योजना यशस्वी होतात, मात्र उत्तरप्रदेशमध्ये फ्लॉप होतात. त्याचे कारण उत्तरप्रदेश सरकार त्यांची योग्यपद्धतीने अंमलबजावणी करीत नाही.
- रिक्शा चालकांनी राहुल गांधी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.
- रिक्शा चालक म्हणाले, आमच्याकडे कागदपत्र असताना आरटीओ अडवणूक करतात. पैसे मागतात.
- राहुल गांधींनी विचारले, पोलिस त्रास देतात का? पैसे मागतात का? त्यावर रिक्शा चालकांनी एका सुरात होय, असे उत्तर दिले.
- रेशन कार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना त्रास होत असल्याचेही त्यांनी राहुल गांधींच्या निदर्शनास आणून दिले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, LIVE छायाचित्र