आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandi Visits Muzaffarnagar Riots Victim Camp

मुजफ्फरनगर दंगलग्रस्‍तांनी अडवला राहुल गांधींचा ताफा, काळे झेंडेही दाखविले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी आज (रविवार) उत्तर प्रदेशच्‍या मुजफ्फरनगर दंगलग्रस्‍तांची भेट घेतली. दंगलग्रस्‍त राहुल गांधींवर प्रचंड नाराज होते. त्‍यांनी राहुल गांधींचा ताफा रोखलाच, शिवाय त्‍यांना काळे झेंडेही दाखविले. राहुल गांधींनी दंगलग्रस्‍तांसाठी लावण्‍यात आलेल्‍या मदत शिबिरांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्‍यांनी दंगलग्रस्‍तांना आपापल्‍या घरी जाण्‍याचा सल्‍ला दिला. स्‍वतःच्‍या घरी न जाता दंगलग्रस्‍तांनी येथेच राहावे, यासाठी काही जण प्रयत्‍न करत असल्‍याचे राहुल गांधी म्‍हणाले.

राहुल गांधींनी दंगलग्रस्‍तांसोबत चर्चा केली. त्‍यावेळी ते म्‍हणाले, तुम्‍ही घरी परत जावे असे दंगल घडविणा-यांना वाटत नाही. ते तुम्‍हाला तुमच्‍या गावापासून दूर ठेवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. परंतु, तुम्‍ही त्‍यांना न घाबरता स्‍वतःच्‍या घरी गेले पाहिजे. हे कठीण आहे. तिथे दहशतीचे वातावरण आहे. पण, आता वेगळा विचार करायला हवा. दिर्घकाळ असे राहणे चांगले नाही.

राहुल गांधींच्‍या दौ-याची आणखी छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईड्सवर...