नवी दिल्ली - राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, राहुल गांधी दीपावलीनंतर काँग्रेस अध्यक्षपद सांभळू शकतात. पायलट म्हणाले की, आता वेळ आली आहे, राहुल यांनी पुढे येऊन पक्ष सांभाळण्याची. ते म्हणाले की, "नेत्यांच्या आडनावांना राजकारणात एखादी उणीव म्हणून पाहिले जाऊ नये. आडनाव त्यांना येथपर्यंत आणू शकते, परंतु शेवटी नेत्याच्या कामगिरीवरच त्याची उंची ठरवली जाते."
दीर्घकाळापासून राहुल यांना अध्यक्ष करण्याची तयारी
- पायलट म्हणाले की, राहुल यांना अध्यक्ष बनवण्यासाठी दीर्घकाळापासून तयारी सुरू आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत आणि दीपावलीच्या काही दिवसांनीच ते अध्यक्षपद सांभाळू शकतात."
पक्षात सर्वांचीच मागणी राहुल यांनी नेतृत्व करावे
- "राहुल यांना घेऊन पक्षात एकमत आहे की, आता त्यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी. त्यांनीच नेतृत्व करावे. पक्षात तरुण आणि अनुभवी नेत्यांचे संतुलन असले पाहिजे."
खूप व्याप आहे काँग्रेस उपाध्यक्षांना
- पायलट म्हणाले की, उपाध्यक्ष पदावरून राहुल सध्या अनेक कामे पाहताहेत. परंतु पक्षाला वाटते की त्यांना अध्यक्षपदी बसवणे दीर्घकाळापासून लांबत चालले आहे, आता ती वेळ आली आहे की त्यांनीच अध्यक्ष बनावे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...