आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Milk News In Marathi, Namo Chai, Divyamarathi

मोदींच्या \'नमो चाय\' विरूद्ध कॉंग्रेसचे \'राहुल मिल्क\'; गोरखपुरमध्ये दूध काउंटर सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर- लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण तापले आहे. कोण असेल देशाचा भावी पंतप्रधान यावर चावडीवरच्या गप्पाही रंगू लागल्या आहेत. कॉंग्रेस विरुद्ध भाजप असे ‍चित्र दिसत असताना नरेंद्र मोदींच्या 'नमो चाय' विरोधात कॉंग्रेसने 'राहुल मिल्क' आणले आहे. उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये कॉंग्रेसने आपले दूध काउंटर सुरु केले आहे.

या काउंटरवर राहुल गांधींचे छायाचित्र असलेल्या कपात आम जनतेला 'राहुल मिल्क' दिले जात आहे. 'राहुल मिल्क'चे शहरात 19 बुथ सुरु असून प्रत्येक बुथवर दररोज पन्नास लीटर दूध वाटप केले जात असल्याचे गोरखपूर कॉंग्रेसचे सैयद जमाल यांनी सांगितले.

'मिठा दूध पिलाएंगे, देश के नौजवानों को पहलवान बनाएंगे' अशा घोषणांचे बॅनरही प्रत्येक बुथवर झळकले आहेत. परंतु 'राहुल मिल्क'च्या माध्यमातून कॉंग्रेस काय साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रश्न सध्या जनतेला पडला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील एका चहाच्या दुकानावर बसून देशातील 300 शहरातील एक हजार चहा दुकानदारांशी संवाद साधला होता. त्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.