आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाती पेन धरता येत नाही, तरीही कायम अव्वल क्रमांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुलसोबत त्याचे कुटुंबीय. - Divya Marathi
राहुलसोबत त्याचे कुटुंबीय.
लुधियाना - पेन धरायलाही हाताच्या बोटांत त्राण नाहीत. मात्र, संगणकाच्या किबोर्डवर बोटे चपळाई दाखवतात. नोट्स तयार करण्यात शारीरिक मर्यादा येतात. मात्र, केवळ ऐकूनच प्रश्नांची सोडवणूक होते. मायलाइटस पोस्ट व्हायरल आजाराने ग्रस्त राहुलची असामान्य क्षमता आहे. राहुलच्या आजारावर जगात कुठेच इलाज नसल्याचे देशातील बड्या डॉक्टर्सनी त्याला सांगितले. मात्र, इच्छाशक्तीच्या जोरावर राहुल आता कसाबसा उठू आणि बसू शकतो.
शाळेचे तोंड न पाहता राहुलने दहावीत पंजाब मंडळाच्या परीक्षेत अव्वल क्रमांक प्राप्त केला. बारावी, बीसीएची तीन वर्षे आणि एमसीएमध्येही त्याने अव्वल स्थान कायम ठेवले. शारीरिक दुर्बलतेमुळे ज्या क्षेत्रात स्पर्धा करू शकत नाही, तेवढ्या क्षेत्रात तो कौशल्य दाखवण्यात असमर्थ ठरतो.

पैसा कमावून तो आईला समर्पित करणे आणि आपल्यासारख्याच मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचे ध्येय बाळगणारा राहुल आयएएसची तयारी करत आहे. याशिवाय तो बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नशीब अाजमावत आहे.

लुधियानामध्ये हॅबोवालच्या एका लहान घरात डावीकडे ठेवलेली खाट. या खाटेवर राहुलने जवळपास आठ वर्षे अंथरुणावर काढून शिक्षण पूर्ण केले. हातात त्राण नसल्याने पुस्तक पकडता येत नव्हते, मात्र आवाजातून त्याची भरपाई झाली. आई हातात पुस्तक धरून त्याच्या डोळ्यासमोर ठेवायची. आठवीचे पेपर दिले तेव्हा तो स्ट्रेचरवर होता. लोकांना आईचा वेडगळपणा वाटायचा. मात्र, राहुलने खासगी पेपर देऊन पंजाबमध्ये दहावीत अव्वल क्रमांक प्राप्त केला.

दहावीआधी आईने प्रत्येक शाळेत जाऊन मुलाच्या प्रवेशासाठी विनवण्या केल्या. मुलाला एखाद्या सत्रासाठी प्रवेश देण्याची विनंती केली. अंथरुणाला खिळून असणारा मुलगा पंजाबमधील हजारो विद्यार्थ्यांना मागे टाकत असेल तर त्याच्यासाठी शाळा का नसावी, असा खडा सवाल त्यांनी केला. यात एक शाळा मिळाली; मात्र बारावीचा काही काळ सोडल्यानंतर शिक्षण सुरू राहिले.

बारावीनंतर राहुलला आपल्या शौच आणि लघुशंकेवर नियंत्रण राखणे कठीण झाले होते. त्याच्यावर मॅकलोडगंजच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरचे उपचार सुरू होते. वडील नाहीत, मी म्हातारी झाल्यावर काही करू शकणार नाही. त्यामुळे तू स्वत:साठी यशस्वी हो, असे आई नेहमी बजावत होती. त्याच्या वडिलांनी आई जयांना एकदा सांगितले होते, याच्या उपचारावर वायफळ खर्च करू नको. ते न ऐकल्यावर पतीने दोघांपैकी एकाची निवड करण्यास सांगितले. आईने मुलाची निवड केली. उपचारासाठी आईने शक्य ते सर्व प्रयत्न केले. दोन वर्षांनी लहान बहीण आईला ट्यूशन आणि घरकामात मदत करत होती. भावासाठी सराव म्हणून
लेखनिकही होत असे.

बीसीएमध्ये राहुलला चांगले मित्र मिळाले. कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने त्याने बीसीएमध्ये पहिला क्रमांक पटकावला आणि एमसीएचा मार्ग मोकळा झाला. राहुल आता स्वत: जेवण आणि अंघोळ करतो. मात्र, जास्त वेळ तो उभा राहू शकत नाही. बसल्या जागी
त्याने क्रेझी डेव्हलपर नावाच्या कंपनीची नोंदणी केली. कंपनीमार्फत काही अॅप आणि गेम्स बनवले जातात. जीके मीडियावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या तयारीची माहिती मिळू शकेल. उच्च शिक्षणासाठी बाहेर पडू शकत नाही, याची त्याला खंत वाटते. थापर विद्यापीठ किंवा पंजाब विद्यापीठ चंदिगडमधून एमसीए करण्याची इच्छा होती.

मात्र, एकटा राहू शकत नसल्याने तिथे जाऊ शकलो नाही. एका इन्स्टिट्यूटमध्ये गेलो, मात्र तिथे रॅम्प आणि लिफ्टची सोय नसल्यामुळे परत यावे लागले, अशी भावना राहुलने व्यक्त केली.