आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरभद्रसिंहांच्या घरी छापे, मुलीच्या लग्नाच्या दिवशीच सीबीआय, ईडीची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला- केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या घरी छापे टाकले. तेही मुलीच्या लग्नाच्या दिवशीच. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या चौथ्या मुलीचे लग्न शनिवारी येथील मंदिरात पार पडले. छाप्याच्या वेळी ते लग्नाला गेले होते.

बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सिमल्यातील निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित देशभरातील ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिल्ली आणि चंदीगडहून आलेली सीबीआयची पथके शुक्रवारी रात्रीच सिमल्यात दाखल झाली होती. काँग्रेसने या कारवाईचा विरोध केला असून मुलीच्या लग्नाच्या दिवशी अशा धाडी टाकणे मानवतेला धरून नाही, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाध यांनी म्हटले आहे.
६.१ कोटींचा भ्रष्टाचार
यूपीएच्या कार्यकाळात वीरभद्र सिंह पोलादमंत्री होते तेव्हा त्यांनी २००९ ते २०११ च्या दरम्यान ६.१ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती मिळवली आणि आपल्या तसेच कुटुंबीयांच्या नावे एलआयसी पॉलिसीत ६.१ कोटींची गुंतवणूक केली, असा आरोप आहे.