आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिपुंज पाठोपाठ राजधानी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्घटना झाली तिथे रेल्वे रुळांची अशी अवस्था झालेली असल्याचा आढळून आले. - Divya Marathi
दुर्घटना झाली तिथे रेल्वे रुळांची अशी अवस्था झालेली असल्याचा आढळून आले.
सोनभद्र - दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ रांची-राजधानी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच दिवसात घडलेली ही दुसरी रेल्वे दुर्घटना आहे. याआधी  हावडा येथून जबलपूरला निघालेली शक्तिपुंज एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी सोनभद्र जवळील फफराकुंड स्टेशनजवळ रुळावरुन उतरली. दुसरीकडे, कानपूरजवळ कालिंदी एक्स्प्रेसही डिरेल होताहोता वाचली. तर, फर्रुखाबाद-फतेहगड दरम्यान रेल्वे रुळाचे तुकडे-तुकडे झाल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लाल कपडा फडकवत या मार्गावरील रेल्वे रोखल्या. गेल्या 19 दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात हा तिसरा रेल्वे अपघात आहे. रेल्वे अपघातांच्या मालिकेने व्यथित होऊन सुरेश प्रभुंनी पंतप्रधानांनी भेट घेऊन या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर 3 सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात पियूष गोयल यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद आले. मात्र नवीन मंत्र्यांना पदभार स्वीकारुन जेमतेम चार दिवस होत नाही तर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात रेल्वे अपघात झाला आहे. 
 
वेग कमी असल्याचने मोठी हानी टळली 
- हावडा-जबलपूर (ट्रेन क्रमांक 11448) शक्तिपुंज एक्स्प्रेसचे गुरुवारी सकाळी साधाराण सव्वासहा वाजता इंजिनासह सहा डबे रुळावरुन खाली उतरले. यात 2 जनरल, 3 एसी, 1 पार्सल बोगी आणि इंजिनाचा समावेश होता. या एक्स्प्रेसला 21 डबे होते. 
- सोनभद्रचे जिल्हाधिकारी प्रमोद कुमार रुळांमध्ये काही तांत्रिक बिघाड असेल त्यामुळे ही दुर्घटना घडली. याची चौकशी केली जाणार आहे. 
- एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठी हानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 
- भारतीय रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले डिरेल झालेल्या डब्यातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. त्यांना रेल्वेच्या दुसऱ्या डब्ब्यांमध्ये जागा देण्यात आली आहे. 
- रेल्वे रुळ जुणे आणि कमकुवत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही सुरक्षा आणि रेल्वे रुळ बदलण्यासाठीच्या फंडांमध्ये वाढ केली आहे. 
- दुसरीकडे, मथुरा-कानपूर रेल्वे मार्गावर फर्रुखाबाद-फतेहगड दरम्यान रेल्वे रुळ 3 इंच तुटलेला आढळला आहे. स्थानिकांनी लाल कपडा दाखवून कालिंदी एक्स्प्रेसला वेळीच थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.
 
मुझफ्फरनगर दुर्घटनेनंतर 4 अधिकारी निलंबित 
- मुझफ्फरनगर रेल्वे दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने कडक पाऊले उचलत चार अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. 
- DRM दिल्ली,  GM नॉर्दन रेल्वे आणि इंजिनिअर विंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. याशिवाय चार अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. 
महाराष्ट्रात मुंबईजवळ दुरांतो रुळावरुन घसरली 
- महाराष्ट्रात नागपूर-मुंबई दुरांतो एस्क्स्प्रेसला मुंबईजवळ नुकताच अपघात झाला होता. टिटवाळा येथे एक्स्प्रेसच्या इंजिनासह 9 डब्बे रुळावरुन घसरले होते. या गाडीला एकूण 18 डबे होते. 
- अपघात सकाळी साडे आठ वाजता दरम्यान झाला होता. त्यावेळी बहुतेक प्रवासी झोपलेले होते. भुस्खलन झाल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. 
 
40% रेल्वे ट्रॅक आउट डेटेड 
- DainikBhaskar.com ने निवृत्त अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली त्यातून समोर आले की देशातील 40% रेल्वे ट्रॅक हे निकामी झाले आहे. 
- निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितले, की रेल्वेमध्ये कामगारांची मोठी कमतरता आहे. दुसरीकडे निकृष्ट दर्जाच्या साहित्यावर काम चालवले जात आहे. यामुळेच दुर्घटना होत आहेत. 
- निवृत्त अधिकारी आणि नॉर्दन रेल्वे मेन्स यूनियनचे अध्यक्ष एस.के. त्यागी म्हणाले, 'रेल्वे दुर्घटनांचे प्रमुख कारण आपल्याकडील 40% ट्रॅक आउट डेटेड झालेले आहे. याशिवाय अनेक ट्रॅक असे आहेत जिथे कायमस्वरुपी दुरुस्ती सुरु असते. ट्रॅक तपासणीचा नियम आहे की सकाळी आणि संध्याकाळी तपासणी केली पाहिजे, मात्र कामगारांची कमी असल्यामुळे तपासणी वेळेवर होत नाही, त्यामुळे दुर्घटना घडतात.'
- 'हे कोणाला माहित नाही असे बिल्कूल नाही. अधिकाऱ्यांपासून प्रशासनापर्यंत आणि कनिष्ट पातळीच्या कामगारांपर्यंत सर्वांना या सर्व गोष्टींची पूर्ण जाणीव आहे. एखादी योजना तयार झाली तरी त्याची फाइल एवढ्या टेबलवर फिरते की ती सापडत देखील नाही आणि कागदावर सर्वकाही पूर्ण होऊन जाते.'
 
उत्तर प्रदेशात दीड वर्षात झालेले मोठे अपघात 
1) 20 फेब्रुवारी 2017: कालिन्दी एक्स्प्रेसचे 12 डबे टुंडला येथे रुळावरुन घसरले. 23 जणांचा मृत्यू.   
2) 20 नोव्हेंबर 2016: कानपुरजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेस दुर्घटना. 121 जणांचा मृत्यू.  
3) 20 मार्च 2015: रायबरेलीजवळील बछरावां येथे डेहरादून-वाराणसी एक्स्प्रेस दुर्घटना. 32 प्रवाशांचा मृत्यू. 
4) 1 ऑक्टोबर 2014: गोरखपुरमध्ये क्रासिंगवर दोन रेल्वेंची समोरासमोर टक्कर. यात 14 जणांचा मृत्यू. 
बातम्या आणखी आहेत...