आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Minister Prabhu Orders To Provide Diaper To Child In Train

ओल्‍या पॅण्‍टमुळे बाळ रडत होते, वडिलाने केले ट्वीट, ट्रेनमध्‍ये मिळाले डायपर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोकारो (झारखंड) - दरभंगा-हैदराबाद एक्‍स्‍प्रेसमध्‍ये रविवारी पॅण्‍ट ओली झाल्‍याने तीन महिन्‍यांचे मुल रडत होते. दरम्‍यान, मुलाच्‍या वडिलांनी रेल्‍वेमंत्र्यांना ट्वीट करून माहिती दिली. डायपर नसल्‍याने मुलाला त्रास होत असल्‍याचे त्‍यात म्‍हटले. बोकारो रेल्‍वे स्‍थानकावर ट्रेन थांबली तर आरपीएफ जवान डायपर घेऊन कम्पार्टमेंटमध्‍ये आले.
डायपरसाठी सक्रिय झाला हायटेक सेल...
- राघव झा हे आपली पत्‍नी प्रतिभा आणि तीन महिन्‍यांच्‍या मुलासोबत बिलासपूरला जात होते. पॅण्‍ट ओली झाल्‍याने मुलगा सारखा रडत होता.
- राघव यांनी सुरेश प्रभू यांना ट्वीट करून आपली अडचण सांगितली. त्‍यात लिहिले की, मुलाला डायपरची गरज आहे.
- ट्वीट मिळताच रेल्‍वेच्‍या हायटेक सेलने रांचीचे डीआरएमला माहिती दिली. डीआरएमने बोकारो स्टेशनला मॅसेज दिला.
- बोकारोचे आरपीएफ इंचार्ज संजीव सिन्हा कमर्शियल टीमसोबत बाजारात गेले आणि त्‍यांनी डायपर विकत घेतले.
बर्थवर पोहोचले आरपीएफ कर्मचारी...
- ही ट्रेन सायंकाळी 6:35वर बोकारो स्टेशनवर पोहोचली.
- आरपीएफची टीम राघव यांच्‍या बर्थवर पोहोचली. मुलासाठी डायपर दिले.