आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे आणि स्कूल बस अपघातातील ‘मृत’ वाढदिवशी घरी परतला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- रेल्वे आणि स्कूल बस यांच्यातील भीषण अपघातात मृत घोषित झाल्यानंतर सहावर्षीय मुलगा जिवंत परतल्याची सुखद घटना येथे घडली. सरकारी चुकीने ‘मृत’ ठरलेला हा मुलगा वाढदिवशी परतल्याने त्याच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.

मेदक जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात 14 मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर स्वामी गौड यांना आपला मुलगा दर्शन याचा मृत्यू झाल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर त्यांचा मुलगा म्हणून एक मृतदेहदेखील गुरुवारीच त्यांच्या ताब्यात देण्यात आला.त्यांनी परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. परंतु दुर्घटनेनंतर दर्शनला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो शुक्रवारी शुध्दीवर ्आला. डॉक्टरांनी त्याल वडिलांचे नाव विचारले. त्यानंतर रुग्णालयाकडून त्यांची माहिती काढून स्वामी गौड यांना कळवण्यात आली.