आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडुमध्ये एक्स्प्रेसचे अकरा डबे घसरले; चार जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरणाकुलम - तामिळनाडुमधील अरणाकुलमजवळील चित्तेरी स्थानकाजवळ मुझफ्फर-यशवंतपूर एक्स्प्रेसचे (15228) 11 डबे रूळावरून घसरले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षाजास्त प्रवाशी जखमी झाले आहेत.

दूर्घटना बुधवारी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून जखमी प्रवाशांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. यात पाच एसी कोच आणि 6 नॉन-एसी कोचचा समावेश आहे. चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृताचा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले आहे. घसरलेले डबे रुळावरून बाजूला करण्‍याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

अपघातामुळे चेन्नईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोवाई एक्‍स्प्रेस, दुरंतो एक्‍स्प्रेस, बंगळूर एक्‍स्प्रेस आणि वृंदावन एक्‍स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. तर, काही गाड्या उशिराने धावत आहेत. दूर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.