आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईहून गुवाहाटीकडे चालता-चालता अर्धी रेल्वे मागेच राहिली...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून गुवाहाटीकडे जाणा-या एक्स्प्रेस ट्रेनचे शनिवारी चालता-चालता दोन भाग झाले. त्यामुळे इंजिन आणि उर्वरित डबे सुमारे एक किलोमीटरपर्यंत पुढे निघून गेले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

ही घटना कटैया दांडी स्टेशनजवळ घडली. ट्रेन सकाळी ४.४० वाजता अलाहाबादपासून ५० किलोमीटर अंतरावरील डभौरा स्टेशनवर पोहोचली. या स्टेशनवरून ट्रेन पुढे निघताच एस ४ आणि एस ५ या दोन डब्यांमधील कपलिंग अचानक तुटले. त्यामुळे इंजिन आणि इतर चार डबे पुढे गेले, पण उर्वरित डबे मागेच राहिले. मागे पडलेला भाग जवळपास एक किलोमीटरपर्यंत रुळावरून चालत राहिला. गार्डने ट्रेनचालकाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर कंट्रोल रूमच्या मदतीने परिसरातील स्टेशन्सशी संपर्क साधण्यात आला. दुस-या इंजिनने मागे सुटलेली ट्रेन कटैया दांडी स्टेशनवर आणली गेली. येथे अन्य डबे जोडण्यात आले. त्यानंतर ट्रेन मार्गस्थ झाली.