आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंपारण्यात सत्याग्रहास 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक विशेष रेल्वेची सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरपूर- रेल्वे विभागाकडून बिहारमधील चंपारण्य सत्याग्रहास १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. याच रेल्वेने गांधीजी (डॉ. भोजनंदन प्रसाद) जंक्शनपासून मोतिहारी  आणि तेथून बेतियाला जातील. रेल्वे बोर्डाच्या कार्यकारी संचालक स्मिता रावत यांनी पूर्व-मध्य रेल्वे (पूमरे) विभागास एक कोच असलेली विशेष रेल्वे चालविण्यास सांगितले आहे.
 
१५ तारखेस रेल्वे जंक्शनहून मोतिहारी येथून निघेल. तेथून २२ एप्रिल रोजी बेतियाला जाईल. गांधीजींचे स्वागत करण्यासाठी सर्व स्थानकांवर थांबा असेल. गांधीजींसोबत त्यांचे दोन सहकारी आचार्य जे. बी. कृपलानी आणि पं. राजकुमार शुक्ला हे दोघे मोतिहारीला जातील.  

जंक्शनवर गांधी धून
यानिमित्ताने आयोजित समारोहाच्या निमित्ताने शनिवारपासून जंक्शनवर वैष्णव जन तो तेणे कहिये... ही धून वाजवण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या अावाजात हे गुजराती गाणे जंक्शनवर एक वर्षभर गांधीजींचे स्मरण करून देत राहील. वरिष्ठ डीसीएम दिलीप कुमार यांनी सांगितले, यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ती सूचना दिली आहे. तसेच एसटी महामंडळाकडून १२५ बसेसची सोय केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...