आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना योगनिद्रा, अखेर प्रशिक्षकाने केले जागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - योगदिनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना आसन करता-करता झोप लागली. कोचीमध्ये योग कार्यक्रमात सहभागी झालेले प्रभू योग क्रिया पूर्ण झाल्यानंतरही उठले नाहीत, त्यामुळे प्रशिक्षक त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा प्रभू झोपी गेल्याचे दिसले. काही जणांनी हे चित्र कॅमेर्‍यात कैद केले. सोशल मीडियावर हे छायाचित्र टाकण्यात आले. सोशल मीडियावर छायाचित्र फिरत आहे. अनेक वृत्तपत्रांनी हे छायाचित्र प्रकाशित केले आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे संघटनांना आवाहन
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुस्लिम संघटना आणि इमामांना सतर्क करत मुस्लिमांच्या श्रद्धेवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. बोर्डाने जारी केलेल्या पत्रकात मोदी सरकार योग आणि सूर्यनमस्कारासारखे कार्यक्रम लागू करून घटनेचे उल्लंघन करत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत असल्याचा आराेप केला. कार्यकारी सरचिटणीस मौलाना वली रहमानी म्हणाले, शाळांमध्ये वंदे मातरम आणि सूर्यनमस्कार सुरू करणे हा त्याचाच भाग आहे.

विरोध करणार्‍यांनी पाकमध्ये जावे : साध्वी प्राची
योगाला विरोध करणार्‍यांनी पाकिस्तानमध्ये जावे. अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. काही मुस्लिम संघटनांनी योगावर केलेल्या टिप्पणीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. निमंत्रण न मिळाल्यामुळे उपराष्ट्रपती कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याबाबत प्राची म्हणाल्या, निमंत्रण द्यायला काय कोण्या नेत्याच्या मुलीचा लग्न समारंभ नव्हता.
बातम्या आणखी आहेत...