आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे थांबवून ड्रायव्हर महाशयांनी खरेदी केला भाजीपाला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - भाजी खरेदी करण्यासाठी तुम्ही कधी रेल्वे घेऊन गेलात? ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु आग्रा इंटरसिटी एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने खरे करून दाखवले आहे.शुक्रवारी सायंकाळी लखनऊहून आग्रा छावणी जात असलेली इंटरसिटी एक्स्प्रेस कानपूरच्या आधी गंगाघाट रेल्वे क्रॉसिंगवर थांबली. सिग्नल लागलेले नसतानाही रेल्वे का थांबली? हे कळायला मार्ग नसल्याने प्रवासी हैराण झाले. याच दरम्यान रेल्वेचा ड्रायव्हर इंजिनमधून खाली उतरला. इंजिनात काही तरी बिघाड झाला असेल असे लोकांना वाटले. परंतु क्रॉसिंगच्या पलीकडे जाऊन ड्रायव्हरने भाजी खरेदी केली आणि तो परत आल्याचे लोकांनी पाहिले. त्यानंतर रेल्वे कानपूरकडे रवाना झाली. त्याचवेळी इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल असे वाटून क्रॉसिंगवरचे कर्मचारीही ड्रायव्हरजवळ पोहोचले. परंतु रेल्वे इंजिनात कुठलाही बिघाड वगैरे झाला नसल्याचे आणि फक्त भाजी खरेदीसाठी रेल्वे थांबवण्यात आल्याचे त्यांच्याही लक्षात आले. मात्र गंगाघाटचे स्टेशन मास्तर प्रेमबाबू यांनी चेन ओढल्यामुळे रेल्वे थांबवली होती, असे कारण सांगितले.