आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे अधिकारी करणार जनरल डब्यातून प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - रेल्वे बोर्डाचे उच्चपदस्थ अधिकारी २६ मे ते ९ जून या कालावधीत एसी कोचमधून नव्हे, तर जनरल डब्यातून प्रवास करणार असून ते चक्क प्रवाशांच्या अडचणी, तक्रारी ऐकून घेणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने या कालावधीत देशभरात प्रवासी सुविधा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

त्यासाठी बोर्डाच्या उच्चपदस्थांपासून विभागीय पातळीवरील अधिकार्‍यांपर्यंत सर्वांना जनरल डब्यातून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्रालय अशा स्वरूपाचे अभियान पहिल्यांदाच राबवत आहे. केंद्र सरकारच्या कामकाजाला वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवासी सुविधा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत बोर्डाच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. त्यांना प्रवाशांचा फीडबॅक जाणून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. विभाग पातळीवर यासाठी िवस्तृत योजना तयार केली जात असून त्यात स्वच्छता, नियमित साफसफाई, सुरक्षा आदी मुद्द्यांवर भर देण्यास सांगण्यात आले आहे.

रेल्वेत मिळणार प्रवासी तिकीट
तिकीट खिडकीवर लांबच लांब रांग असल्याने तुम्ही तिकीट न घेताच ट्रेनमध्ये चढला असाल तर तुम्हाला टीसी पकडून दंड आकारेल ही भीती असते, परंतु आगामी काळात प्रवाशांना रेल्वेच्या डब्यांमध्येच तिकीट देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वेने प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी आता ट्रेनमध्ये तिकीट देण्याची योजना तयार केली असून याअंतर्गत टीटीईंना हँड - हेल्ड मशीन देण्यात येणार आहे. त्यामुळे तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून टीटीई दंड आकारणार नाही, तर जागेवरच तिकीट देईल. हँड - हेल्ड मशीनद्वारे टीटीई रेल्वेतील प्रवाशांना तिकीट देईल. सुरुवातीच्या टप्प्यात ही प्रणाली सुपरफास्ट ट्रेनमध्ये व नंतर इतर गाड्यांमध्ये लागू करण्याची रेल्वेची योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...